आज एक मोठा घोटाळा झाला होता….नाही माझ्या हातुन नाही..हाबीब
एक्सचेंज मधुन….म्हणजे झाल काय….
आज गुरवार…बॅका आणी एक्सचेंज दुपारी एक वाजे पर्यंतच त्या मुळे घाईने
मी माझी कामे अटोपती घेत होते..हाबीब एक्सचेंज मध्ये जानुन T.T.
(Telegraphic Transfer) चा form भरला..Beneficiary details.
भरले.अमाउंट होती.. $ 32,485.00 (USD) ते AED tr. Dhs.
1,19333.75 आणी भारतात ती जाणार होती (INR) Rs. 15,51338.75
हा टी.टी. मी हॉग- कॉंग च्या पार्टीने काल जी टी.टी. पाठवीले होती ती
क्रेडीट झाली असणार या बेसीस वर केला आणी बाकीची कामे करुन घरी
आले.
काही वेळाने हॉग- कॉग च्या पार्टीचा फोन आला की शीपमेंट मद्धे
अडचणी आल्यात कनटेनर आजुन हातात न पडल्याने त्यांनी केलेला
टी.टी. बाद झाला आहे. ती अमाउंट ते भारतात जमा करतायेत.
मी मनात विचार केला झाल अता आपली टी.टी ही बाद झाली
असणार…थोड्या वेळात त्यांचा फोन येणारच….अता पुढच्या पार्टीच
काय करायच या विचारात मी होते…बराच वेळ गेला तरी एक्सचेंज मधुन फोन
नाही म्हणुन मी सहज चौकशी केली …तर..माझा टी. टी त्यांनी पास
केलेला…मनात विचार केला बापरे ! म्हणजे अजुन कालची टी.टी डेबीट
पडलीये हे लक्षात आल नाहीये वाटत? नेहमीचे कस्टमर असल्याने आणी आज
गर्दीही भरपुर असल्याने स्टाफ ने एन्ट्री क्रेडीट झाली का नाही हे मेन स्ट्रीट
एक्सचेंज वरुन कदाचीत पडताळुन पाहीले नाही आणी माझी एन्ट्री क्रेडीट
दिली होती… अर्थात क्लोजींग होताना हे त्यांच्या लक्षात येणारच होत..पण
हातात त्याच्या काही राहील न्हवत..पैसे लवकरात लवकर भरा ईतकच ते
सांगु शकले असते.
आज अर्धा दिवस…उद्या येथे सुट्टी….अता भारतात शनिवारी हाफ
डे..रविवारी सुट्टी.. एक्स्चेन्ज सोमवारी बॅकेत कळवतील आणी मला
मंगळवारी याचे पैसे भरावे लागतील… माला ५ दिवस मीळणार
होते..म्हणजे जवळ जवळ २८ – ३० हजाराचा फायदा… काय करावे? एकदा
विचार आला यांना विचारुन ठरवावे…. पण एक बीझनेस मॅन काय म्हणार
माहीत होत मला… माझ्या रक्तातही हा गुण असला असता तर आज मी ही
एक प्र्याक्टीकल बीझनेस उमेन नसते का झाले…??? पण बीझनेस माझ्या
रक्तात नाही..बाबा डीफेन्स मधे…सायन्टींस..ही.त्याची मुलगी…आणी एका
बीझनेस मॅन ची बायको…….दोघांमधे…युद्ध सुरु झाल… …मनाची
चलबीचल वाढु लागली….बांबाची शिकवण …देश प्रेम..?…की…बीझनेस चा
फायदा…काय कराव…फक्त २० मी. उरली होती….निर्णय मालाच घ्यायचा
होता….आपला फायदा करुन घ्यावा हा विचार आला …आणी..मला बाबांची
जास्तच आठवण येवु लागली…मन म्हणाल नाही …भारती…बाबांनी तुला
हे शिकवल नाही…आधी फोन करुन सांगुन टाक…एक तर …पैसे भर…नाही
तर…टी. टी..कॅन्सल कर…पण टी.टी कॅन्सल केली तर समोरची पार्टी
नाराज झाली असती…काय करावे…आणी…एकदम भारतीच्या डोक्यात प्रकाश
पडला…आपले बॅकेत खाते आहे..त्यांना रीकवेस्ट करुन सी.सी..(कॅश क्रेडीट)
वाढ्वुन घ्यावा…. त्याचा थोडा ईन्टरेस्ट भरावा लागला तरी हरकत
नाही…मग भारतीने लगेच मुजाहीद ला हाबीब मधे पाठ्वीले…आधी झाल्या
प्रकाराची पुर्ण माहीती फोन वर दिली…भारती बॅकेत पळाली. १० दिवसासाठी
सी.सी वाढ्वुन घेतला..आणी..हाबीब मधे जावुन पैसे भरले…हाबीब नेही माझे
आभार मानले…
माझ्या ही डोळ्यात पाणी आल होत मन म्हणत होत….बाबा….तुमची…
मुलगी …अस काही ….करणार नाही…ज्याने…ती स्वतःच्याच नजरेला नजर
नाही देवु शकणार .
भारीने काय सांगीतल आल ना लक्षात? की परत एकदा सांगु दे ????
July 28, 2006 at 9:02 am
bagh na kadhi kadhi ase prasang yetat ki aplyala aksharash: farach thodya velat paryay nivdava lagto. Tyahi peksha swatahachya aani aaplya priy vyaktinchya apekshabhangachi bhiti vatate. Asha veli swatahachya najaretun apan utarnnar nahi na? ha prashn vicharla ki niwad prakriya baryapaiki sopi houn jate.
Tujh article farach chhan aahe. thodya terminologies samajayla awaghad gelya. pan flow tutat nahi.
Internet problem mule kadachit tula don tin vela hi post milel. kshamasv:
August 24, 2006 at 9:45 am
great commet plz do like such a thing in our life , so we can protect our country from & our culture.
September 12, 2006 at 10:35 am
good
October 7, 2008 at 6:45 am
प्रिय ब्लोगर ,
तुझा मराठी ब्लोग वाचुन खुप छान वाटलं..
खुप उत्तम प्रतीच लिखण तु तुझ्या ब्लोग मध्ये केलं आहेस..
परंतू हे लिखाण जस्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचविणही महत्वाच आहे..
त्याबद्दल मी थोड माझ्या ब्लोग मध्ये लिहिल आहे..
त्याची तुला नक्कीच मदत होइल..
चल..पुन्हा भेटुच ब्लोग मधून..
मझ्या ब्लोग वर नक्की ये..
http://pune-marathi-blog.blogspot.com/