त्रिकोण

तो एका मोठ्या कंपनीत कामाला होता. लहान पणापासुन चाकोरी बद्ध जीवन जगत आलेला.शाळा , कॉलेज मध्दे अतीशय हुशार मुलांमध्ये गणला जाणारा. वकृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धेत कायम चमकणारा.त्याच्या सुंदर व्यक्तीमत्वात या सगळ्या गोष्टी कायम  भर घालीत.त्यामुळे साहाजीकच सगळ्यांचा आवड्ता. कंपनीतही त्याची अशीच छाप पड्लेली.तो ग्रुप मध्दे सगळ्यांचा लाड्का होता.  कोणत्याही विषयावर तो बोलु लागला की सगळी मंडळी मंत्रमुग्ध होऊन ऐकत असत.

त्या दिवशी अशीच सगळी मंडळी कॅन्टीन मध्दे जमलेली होती. वाफाळलेल्या कॉफीचे घोट घेत तो कुठ्यातरी विषयावर बोलत होता.आणी बाकीचे “बरोबर बोललास हो अगदि.”म्हणुन दाद देत होती.तेवढ्यात एकदम त्याचे मुद्दे खोडुन काढ्त “ती” बोलु लागली.खुप मनापासुन….. मुद्देसुद ती आपले विचार मांडत होती. सुरवातीला तो ही तीची प्रतिभा पाहुन प्रभावित झाला. सगळे तीचे विचार मन लाउन ऐकु लागले.त्याला अशा गोष्टीची सवय नसल्याने मनातुन थोडा चीड्ला.पण तरीही आज खरच चर्चा रंगली म्हणुन आनंद ही झाला. त्याने तीला या आधी कधी ग्रुप मध्दे पाहीले न्हवते. सहज चौकशी केल्यावर कळ्ल ती त्यांच्या कंपनीत नुकतीच जॉईन झाली आहे.  त्यादिवशी रात्री त्याला काही झोप लागेना. आजचा हीचा हा विषय आवड्ता होता म्हणुन ही ईतक बोलली की खरच ही चर्चा बाहाद्दुर आहे? हे त्याला जणुन घ्यायचेच होते. त्याला तीच्याबद्दल ईर्षा झाली होती.त्या रात्री काही क्लीष्ट विषय त्याने मनात विचार करुन ठेवले.आणी मग त्याला शांत झोप लागली.

परत दोनचार दिवसातच कॅन्टीन मध्दे त्यांचा तो ग्रुप जामुन आला अर्थात ती त्या ग्रुप मध्दे होतीच. तीला पाहुन कधी चर्चा सुरु कारतो अस त्याला झाल होत. सगळयाना घरी जाण्याची घाई होती, तरी ” जाशील रे, ही कॉफी तर घे.” म्हणत सगळ्यांना त्याने कॉफी मागवीली. कोणताही विषय चर्चेस नसताना ओढुन ताणुन त्याने तो क्लीष्ट विषय काढलाच. विषयाची माहीती बरीच असल्याने तो बरच काही बोलु लागला. परत सागळॆजण त्याला दाद देवु लागले. पण आज त्याच स्तुतीवर्षावावर मुळी लक्षच न्हवत,त्याची नजर फक्त तिच्या प्रतीक्रीयेवर होती, त्याला जणु खात्रीच होती की आजही  आपल्याला दाद दिल्याशीवाय राहाणार नाही. पण झाल अगदी उलट. तीने त्याचा विषय नीट समजावुन घेतला. मनात मुद्दे तयार केले, आणी तो बोलण्याचे थांबताच हिने आपले विचार मांडायला सुरवात केली.याही विषयावर ती भरभरुन बोलु लागली. तीच्या, प्रत्येक शब्दांवर जोर देत मुद्दे मांडण्याचा हातोटीच सगळ्यानी तोंड्भरुन कौतुक केल. पण या कौतुकाने ती भारावुन गेली नाही.आपले सगळे विचार मांडुन झाल्या वर ती परत आगदी शांत बासुन राहीली. स्वताची मत मांड्ताना अगदी उफाळुन बोलणारी ” ती”  आणी आत्ताची अगदी निर्वीकार चेहर्यातली ”ही”. त्याला काहीच कळॆना. तो मनातुन खुप अस्वस्थ झाला. त्याच लाड्वलेल मन हीच्या समोर हार मानायला तयार न्हवत.घरी जाण्याच्या ओढीने सगळेच उठ्ले,त्याला अजुन वाद घलुन आपलच म्हणन खर करायच होत,  मग नाईलाजाने तो ही उठला. रस्त्यात तो फक्त तीचाच विचार करीत होता.घरी आल्यावर,जेवताना,झोपताना त्याला फक्त तीची चर्चाच अठऊ लागली. बोलताना तीचे हावभाव,आवाजातील चढ उतार, बोलताना मधे मधे चेहर्यावर येणार्या केसांना मागे सारण्याची तीची विशीष्ट पद्धत, मधुनच डोळे मोठे करुन,सगळ्यांवर टाकलेला कटाक्ष, कीती आणी कीती तरी गोष्टी.

आता मात्र तो रोजच त्या ग्रुप मद्धे येउन बसु लागला,कॉफीचे घुटके घेत घेत तीच्याशी चर्चा करु लागला.ग्रुप मद्धे आसुनही ही दोघे एकटेच कोणत्याही विषयावर चर्चा करु लागली.नंतर नंतर कोणी असो नसो यांच्यातच गप्पा सुरु झाल्या.एखाद्या दिवशी तीने ऑफीसला दांडी मारली की हा अस्वस्थ होऊ लागला. थोड्या फार फरकाने तीचीही अवस्था त्याच्यासारखीच झाली होती. त्याचा बरोबर तांसतास ती बोलत राही.त्याच्या रुबाबदार व्यक्तीमत्वाने तीला ही भुल पाडाली होती. ग्रुप मध्दे आता ती चर्चेचा विषय ठरु लागली होती. एव्हाना त्याला कळुन चुकले की आपल्या आभ्यासाची भुक फक्त हीच भागवु शकते,हीच्याशी बोलल्याने जे समाधान आपल्याला मीळते,ते ईतर कशातही नाही. तो मग खुपच अस्वस्थ होतो.रात्र रात्र त्याला झोप लागेनाशी होते. सतत तीचेच विचार मनात घोळू लागतात. डोळे मीट्ले तरी तीचाच सुंदर चेहरा त्याल दिसत असतो. तीचा विरह ईतका असाह्य होतो की, डोळ्यातुन न कळत अश्रु वाहु लागतात.  मन त्याला सांगत असत…. हीच ती… जीची तु वाट पाहात होतास….हीच तुझ आयुष्य पुर्णत्वाला नेउ शकते,…. हीच्या शीवाय तु अर्धवट आहेस…. पण…. पण.. आता हे काहीच शक्य नाही. तु खुप उशीर लावलास गं यायला….मी तुझा अता नाही होऊ शकत ….त्याच्या या अगदीगतेचा त्याला खुप राग येतो.. हाताच्या मुठी घट्ट आवळ्त अश्रुनां तो मोकळी वाट करुन देत असतो. त्याच्या शेजारीच  शांत झोपलेल्या त्याच्या बायकोला या घोंगावण्यारया वादळाची काहीच क्लपना नसते. तो एक नजर तीच्या चेहर्यावर टाकतो. तीच्या बाहुपांशाचा विळ्खा अलगद सैल करत दुसर्या कुशीवर वळतो.मनात एक ध्द्रुड निश्चय करुन झोपण्याचा उगाच प्रयत्न करीत राहातो.

मन खुपच उदास असते,कुठल्याच कामात त्याचे लक्ष लागत नाही.मग मनाशी काहीतरी पक्के ठरवुन तीला फोन करतो. दोघांच भाहेर भेटायच नक्की होत.असा फोन आपल्याला कधीतरी येणारच होता हे तीलाही माहीत असत.भेटण्याच्या ठीकाणी जायला ती जरा लवकरच नीघते,तीच्या श्वासांचा वेग वाढलेला असतो,आजुबाजुच जग ती विसरते.कुठल्याश्या धुंनदीत ती त्या जागी पोहचते. पाहातेतर तो तीच्या अगोदरच तेथे आलेला असतो. त्याला पाहुन ती जाम खुश होते.ज्या शब्दांची ती वाट पाहात असते ,आज ते शब्द त्याच्या ओठातुन बाहेर पडनार असतात. ठरल्याप्रमाणे कॉफीची ऑर्डर देवुन तो तीच्या नीरागस चेहर्या कडॆ एक नजर टाकतो….तीचा तो गोड,अधीर चेहरा पाहुन त्याचे डोळॆ भरुन येतात. पण कधीतरी यावर त्याला बोलावच लागणार असत. जड मनाने तो विषय काठतो. मी…. मी…तुला एका गोष्टी बद्दल कधी बोललो नाही…. म्हणजे तसा कधी विषयच निघाला नाही….. सुरवातीला मी फक्त तुझ्याशी गप्पा मारायचो…. तुझ्याशी वाद घालायला मला खुप आवडायच….हळु हळु मी तुझ्यात गुंतत जाऊ लागलो.तुझ्या बद्दल माहीत नाही …पण….” ती ही खुप आधीर होऊन हे सगळ ऐकत असते.मनातुन जाम खुष असते. मनातल्या मनात म्हणत असते माहीत आहे मला. पुढे बोल, जे ऐकण्यासाठी माझे कान तरसले आहेत. आणी मग तीच्या कानावर ते शब्द पडतात….”माझ लग्न झालय. त्या मुळे  तु माझ्यात गुरफटु नये.जे माझ्या बाबतीत घडतय ते तुझ्या …… तीला पुढ्चे कोणतेच शब्द ऐकु येत नसतात.डोक्यात कोणीतरी जोरजोरात घाव घातल्याचा तीला भास होत असतो…मन एकदम सुन्न होत. … डोळ्यातुन घळ्घळ अश्रु वाहु लागतात….तीच शरीर पुर्ण स्तब्द होत…अंगात काही त्राणच उरत नाही.तीचे पायही थरथरत असतात. अश्याच आवस्थेत ती तेथुन उठते.आपण एक पाउलही पुढे टाकु शकत नाही अस तीला वाट्त, पण आधार मागायचा कोणाला? जो आपला वाट्ला तोच अता परका झालेला असतो. सतत वाहाण्यारया अश्रुंना अवरत घरी पोहचते.घ्ररी गेल्यावर मात्र तीचा बांध फुटतो. खुप खुप ती रडुन घेते. ३ – ४ दिवस ती ऑफीस मद्धे पण जात नाही.खाण्या-पीण्यातुन तीच लक्ष उडालेल असत. सगळ्याचा एकत्रीत परीणाम म्हणुन तीला खुप ताप चढतो.

येथे याची पण स्थीती तशीच असते. ती ऑफीसला येत नाहीये पाहुन खुपच बेचैन होतो. तीला भेटायला जाउ का नये..याच विचारांमध्दे असतो. स्वतःच्या निर्णयावर आपण ठाम राहु की नाही याची त्याला शास्वती नसते. आणी तेवढी सदसद विवेक बुद्धी जाग्रुत असल्याने तो जाण्याचे टाळ्त असतो.असेच ५ – ७ दिवस उलटुन जातात. ती अजुनही कामावर आलेली नसते.शेवटी चौकशी अंती कळत ती अजुनही आजारीच आहे. मग मात्र त्याला राहावत नाही. तो एक s m s   करतो.”तु कशी आहेस? ऑफीस मदधे ८ दिवस झाले आली नाहीस.”

घ्ररी ती त्याच्याच विचारात पड्लेली असते.आणी तीतक्यात मोबाईल वाजतो.ईच्छा नसतानाही ती तो SmS  उघड्ते. त्याचा मॉसेज पाहुन तीला खुप आनंद होतो.आणी डॊळ्यातुन नकळ्त आश्रु वाहु लागतात, परत त्याला काय उत्तर द्यावे ,याच विचारात ती असते.कारण हीच वेळ दोघांच्याही परीक्षेची असते.आधी फक्त आपलाच वाट्णारा तो आता तीला परका झालेला असतो. येथे अजुन उत्तर येत नाही म्हणुन याची ही बेचैनी वाढ्त चाललेली असते. शेवटी बराच वेळ वाट पाहुन तो तीला फोनच करतो. परत मोबाईलची रींग वाजते तेंव्हा ती फोन घेते.ईतक्या दिवसानंतर त्याचा आवाज ऐकुन तीचा बांध फुट्तो.ती फोन वरच रडु लागते. आता मात्र त्याला धीर धरवत नाही.आपली गाडी काढुन तो सुसाट वेगाने तीच्या घरी जाण्यास नीघतो. वाटॆत अनेक वीचार मनात येतात… तीला समजवुन परत तीची गाडी रुळवर आणु …  वैगेरे. एव्हाना तीच घर येत. गाडी पार्क करुन तो वर जातो दार बंद असते. बेल वाजतो. एकदा…..दोनदा….. तीनदा…. ती दार उघडे पर्यंत पण याला धीर नसतो. ती कोण बेल वाजवतय म्हणुन दार उघड्ते.समोर याला पाहुन  परत ती रडु लागते.तीला सावरण्यासाठी तो तीचा हात पकड्त बेड वर नेतो. तीच्या अगांत चांगलाच ताप आहे.हे त्याच्या लक्षात येत.कसेतरी समजवुन तीला डॉक्टर कडे घेवुन जातो,परत येताना सगळी औषधे  घेवुन येतो.तीला नीट झोपवुन तो तेथुन नीघतो. रात्र भर त्याला झोप लागत नाही, ”आपल्या मुळे आज तीची ही अवस्था झाली.या परक्या गावात तीच कोणही नाही. अशा स्तीथीत कोण पाहील तीला? ”

दुसरया दिवशी सकाळीच उठतो. ऑफीसला जायला नीघतो पण गाडी आपोआप तीच्या घरच्या दिशेने वळते…. एव्हाना तीचा तापही कमी झालेला असतो,डोळे मात्र रात्र भर रड्ल्याची चुगली करीत असतात.याला परत घरी आलेल पाहुन तीला खुप आनंद होतो. तीचा ताप गेला की नाही पाहाण्यासाठी तो आपला हात तीच्या कपळावर ठेवतो. त्याच्या त्या पहील्या स्पर्शाने तीचा कणनकण मोहरुन उठ्तो.तीचे डॊळॆ आपोआप बंद होतात. तीचा ईतका सुंदर चेहरा पाहुन त्याच्याही ह्रुदयाची धड्धड वाढ्लेली असते. आपण जीच्यावर ईतक प्रेम करतो तीला जवळही घेवु शकत नाही…. ही असाह्यता त्याच मन पोखरुन टाकते. त्याला कळ्त आता ईथे थांबलो तर स्वताला आवरण शक्य नाही…. आणी मग तो पट्कन आपला हात मागे घेत जाण्यासाठी वळतो. त्याला जाताना पाहुन ती ही बेचैन होते.मागचा पुढचा विचार न करता धावत जाउन त्याला मीठी मारते. तीचा अवेग पाहुन त्याला ही राहवत नाही.तीला जवळ घेवुन तीच्यावर तो प्रेमाचा वर्षाव करत असतो.आणी ती त्यात न्हाउन नीघत असते.आणी मग अचानक तीला जाणीव होते. हे चुकीच आहे.ती चटकन त्याच्या पासुन दुर जाते.त्याच्याही ही गोष्ट लक्षात येते . जेव्हा  तो तेथुन जाण्यास नीघतो,तेव्हा  आता परत कधीही एकमेकांना भेटायच नाही हे अश्वासन घेवुन.

ऑफीस मध्दे जातो पण सगळ लक्ष त्याच तीच्यातच असत. खर पाहाता आज तो सुखात न्हाहात असतो. झालेल्या गोष्टींची दहादा उजळणी करत स्वताच स्वताशी हासत असतो.तीच्या स्पर्शाने, तीच्या सौद्र्याने तो अगदी वेडा झालेला असतो. तीची ही अवस्था तशीच असते. मग प्रत्येक वेळी शेवट्चीच भेट म्हणत ती दोघे भेटतच जातात.आणी मग त्यांना अता कळुन चुकत की आपण आता एकमेकांशीवाय नाही राहु शकत. मग एक दिवस मुहुर्त पाहुन ४ – ५ मीत्र मैत्रीणींना घेवुन ते वैदीक पद्ध्तीने लग्न करतात. त्याने तीच्यासाठी एक नवीन फ्ल्याट घेतलेला असतो.लग्न अटोपल्यावर सगळ्यांना एक मोठी पार्टी देवुन ते आपल्या नवीन घरी जातात. आत गेल्यावर तो दार लावुन घेतो.ती आज खुपच सुंदर दिसत असते. तीला न्याहाळ्त तो तीला जवळ घेतो. आज त्यांची मीलनाची रात्र असते.आज ते सगळ्या बंधनातुन मुक्त असतात.त्याच्या प्रेमाचा प्रचंड आवेग पाहुन ती ही स्वतःला त्याच्या पुर्ण स्वाधीन करते.आज पुर्ण अर्थाने ती त्याची झालेली असते. काही काळ असाच जातो. रात्रीचे बारा साडॆबारा झालेले असतात. तो उठतो. तयार होऊ लागतो. ती त्याला विचारते “अत्ता या वेळी कुठे नीघालात?” तो खुप जड आवाजात बोलतो ”मला त्या घरी गेल पाहीजे.ती घरी एकटी आहे? तीला अजुन यातल काही माहीत नाही.”त्याची वाक्य ऐकुन ती एकदम स्तब्ध होते.डोळ्यातुन पाणी येवु लागत.कसबस ती ईतकच म्हणते ” आज आपली पहीली रात्र ना? तुम्ही मला अस सोडुन कस जाउ शकता?” तो तीला समजावुन तेथुन नीघतो.त्या दिवशी मात्र तीचे डोळे खाड्कन उघडतात.बापरे या विषयावर आपण याच्याशी कधी बोललोच नाही.अता रोजच आपण आसे एकटे राहाणार?  तीला तो आपल लग्न झालय हे काधी सांगु शकेल की नाही? आई – वडीलांशी पण नात तुट्लय. मागचे सगळॆ दरवाजे अता बंद झालेत.या चार भींतीतच आपल्याला आयुष्य काढाव लागेल का? त्याची बायको म्हणुन आपल काही स्थान असेल का?अशा अनेक प्रश्नांचा भडीमार तीच्या मनावर होत असतो. डोळ्यातुन ओघळ्णारया अश्रुंन शीवाय तीच्या हातात काहीच उरलेल नसत……

क्रमशाः……

One Response to “त्रिकोण”

  1. Prajakta Patil Says:

    I like your article. Keep it up.

Leave a Reply