प्रत्येक सभासद हा आपल्या ब्लॉग वर प्रेम करीत असतो. त्याच्या ब्लॉग
विषयीच्या भावना वेगवेग्ळया प्रकारे प्रकट होत असतील पण ऊत्कट्ता
सारखीच.शक्य होईल त्या प्रमाणे त्याला तो सजवण्याचा प्रयत्न ही
करतो. आपापाल्या कुवती प्रमाणे मनात काही आराखडे तयार करतो. येथे
कुवत म्हणजे दुसरयाने वाचुन ठरवलेली असते ती. कारण स्वताःच्या
ब्लॉगवर लीहीताना त्याच्या द्दुष्टीने कुवत नेहमी असीमच असते. त्यावर विश्वास
ठेवुन तो वाट्टेल ते वाट्टेल त्या वेळॆला लीहीत असतो.तसे व्यक्ती स्वातंत्र
आणी विचार स्वातंत्र त्याला या नेट्नेच बहाल केले.त्यामुळे बुद्धी आणी मन
यांची सांगड घालत आपल्या लाड्क्या ब्लॉगचे आयुष्य वाढ्वायच. अता मन
आणी बुद्धी हे तराजुत टाकलेल्या लोण्याच्या गोळ्या प्रमाणे असतात. कारण
मन या विषयी कोणीही मापदंड लावु शकत नाही. एकवेळ त्या सागराची
कीती खोली? ते कळेल पण मनाची? ते शक्य न्हवे. कधी ते जगाने निषेध
केलेल्या गोष्टीची पुरर्तता करुन मागेल तर कधी जगातील अमुल्य वस्तुलाही
ठुकरावुन अगदीच साधारण गोष्टीची खातरजमा करेले याचा नेम नाही. तर या
मनाच काही संगता येत नाही. पण बुद्धीच तस नाही. तीला माप दंड आहेत.
म्हणजे तशी सर्टीफीकीटस तर जोड्ली जातात. त्याचा विचार करुन कीतपत
बुद्धी ती ठरवीता येते.अता यातही वादाचे मुद्दे असु शकतात. ज्यांच्या हाती ही
लेबल नाहीत ती ही चांगली खावुन पीवुन आहेत. मीठ्मोठी पद घेवुन कारभार
हावा तसा चालवतायतच की.(बुद्धीचा वापर वेगळ्या प्रकारे करुन, पण त्या
साठीही ती असावी लागतेच.)असो तर तात्पर्य आसे की बहुतेकांना मन आणी
बुद्धी यांचे सम प्रमाण कींवा मी तर म्हणेन जास्त वाटा
बुद्धीचा घेवुनच लीखाण पारायण सुरु करावे लागते, काही ब्लॉग वाचले की
वाट्त काय प्रंचड बुद्धी आहे ही. पुर्ण मरठी विश्वाचच दर्शन होत.मराठी
साहित्यातले कीतीतरी पैलु त्यांनी आपल्या पुढे मांड्लेले आहेत. कीतीतरी
वेगवेळया विषयांची माहीती ते करुन देतात. त्यांचा सखोल आभ्यास … विषय
मांडण्याची हातोटी यावरुन त्यांच्या कुशाग्र बुद्धीची चुणुक आपल्याला दिसते.
अर्थात हे त्यानीही मनापासुनच केलल असत. आशा ब्लॉगला आपण मनापासुन
दाद देतो.आशा भव्य दिव्य ब्लॉग समोर आपण म्हणजे शालु समोर
जुनाट धोतर. (ईथे चुकले आपण नाही. मी. नाही तर तुम्ही म्हणाल आमची
पैठणी नेसायची लायकी असताना हे काय धोतर वैगेरे…. )चार चैघात न
दाखवत्या येण्यारया मनाला चोर कप्यात द्ड्वत जे जे चांगले ते तुमच्या
चरणी अर्पण अस काहीस घोश वाक्य यांच असाव. कारण मनाचा तो चोर
कप्पा कप्प्यातच ठेवलेला असतो. व्ययक्तीक भावनांना सार्वजनीक ठीकाणी
कीती व कश्या प्रकारे उघड करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आता परत
हा मुद्दा की आपला ब्लॉग हे सर्वजनीक ठीकाण कस,कारण मनातल तर
उघड करायला ही खटाटॊप असते. मग वैयक्तीक झाल, पण तरीही,सार्वजनीक
वाटण्याच कारण – जरी कुणी कुणाला पाहील नाही तरी विचारांच्या माध्यमाने
प्रत्येकाने आपापल्या कुवती नुसार वाचकाच्या मनात स्वताची एक प्रतीमा
तयार केलेली असते. आणी त्याला तडा जावु नये हाच प्रत्येकाचा
प्रयत्न. म्हणजे स्वतःवर आपण कीती प्रेम करत असतो ते पाहा.
याच एक उदा. मी तुम्हांला देवु शकते.
1. पाकक्रुती.
बटाटा वडा - १२ प्रतीक्रीया
भजी – १० प्रतीक्रीया
रसमलाई – १९ प्रतीक्रीया
अता याला काय म्हणायच. आपला चॉईसच असा झालाय की आजु बाजुला न
पाहाता आपल्याच रिंगणात गोल गोल फीरायच. येथे ईतके सुरेख लेख मी
वाचलेत की मन थक्क झाल्या शीवाय राहात नाही.त्याची प्रगल्भता कौतुक
करण्यासारखी आहे. एकाने ‘स्त्री जिवन तुझी काहानी’हा ईतका सुंन्दर लेख
लिहीला आहे.५-६ पाने सहज असेल, कीती निरेक्षण आसेल त्यांच.कीती वेळ
घालवला असेल त्यानी त्या साठी. आधी निरीक्षण, मग विचार मंथन,आणी
मग लिखाण, पण त्या लेखाला एकही प्रतिसाद नाही. एकजण Software
Engineer. त्यानी संगीत शास्त्राची कीती छान माहिती
दिली आहे.कीती आभ्यास आहे त्यांचा त्यावर पण प्रतिसाद नाही.अशी एक
नाही १०० उदा. आहेत. कीती सुंदर कविता आहेत. प्रतिसाद एकही नाही. तुम्ही
म्हणाल हे व्यक्ती स्वातंत्र आहे.बरोबर. पण हेच कौतुक चौकटीच्या बाहेर पडुन
जरा रुदांवुदेना. म्हणजे आप भी खुश - हम भी खुश, सभी खुश .
२.एक कविता – स्त्री – पुरषात एकच नात, नर मादीच.
येथे आपण २१ व्या शतकातुन एकदम आदिमानवाच्या जंगलात पोहचलो.यांनी
मात्र व्यवहाराला कमी आणी मनाला मोठे पणा देत जे वाट्ल ते खर खर
लीहील. मोठ्या मनाचे राजे.
३.यात साध्या मराठ मोवळी माणसाच्या नावापुढे ‘राव’ न लावता ‘जी’ लावुन
हिंदी भाषेच मराठी भाषेवर होणार अतिक्रमण या वर गरमागरम चर्चा. नावा
पुढे ‘राव’ लावा नाहीतर ‘जी’ अर्थ एकच. आदराचा.मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश
येथील लोकांना ‘जी’ लावायची सवय असते त्यातुन फक्त आदर भाव
ओळखायचा, की मराठी माणसाला राव का म्हणाला नाही म्हणुन
भांडायच?तस राव ही खुप जुन झालय. अता राव म्हटलेल आवडेल कोणाला ?
४. ‘मी हे आयुष्य का जगतोय?’ हा पहिला लेख आहे ज्याने व्यवहारी बाजु
बाजुला ठेवली आणी अगदी मन मोकळ केल.हे धाड्स कोणाचाच झाल नाही.
प्रत्येकाच्या हातुन कोठेना कोठे चुक झालेली असते.(लाहान मोठी.) मन ती
कुठेतरी व्यक्त करायला मागत असत, पण आड येते आपली अस्मिता. ती उघड
पाणॆ मांड्ली उपेन यांनी. ते त्यांच्या आयुष्यात चुक की बरोबर हे त्यांनाच
माहित. पण वाचकाने तो लेख वाचल्यावर एवढ तर लक्षात येत की आपण
नाही या जंजाळात/ कींवा आहोत तर वेळीच सावध झाल पाहिजे. एवढ झाल
तरी त्या लेखाने खुप मीळ्वले. प्रतिसाद एकही नाही.
मला फक्त एवढच वाटत आपण जेव्हां ब्लॉग उघडतो त्यावेळी बाकीच्य लेखांवर
नजर मारतोच.कोणी शिता वरुन भाताची परिक्षा करुन एकदोन ओळीत आपले
वाचन आटोपते घेतो तर कोणी पुर्ण लेख वाचतो. पण वाचतो आपण सगळेच.
मग वाचलेच असते तर त्यावर टिपणी द्यायला काय हारकत आहे. फार वेळ
जाणार नाही आपला,आपण जे काही लीहु ( चुक वाट्ले तर काय चुकले?
यातुन त्याच्या त्या विषयाला नविन द्रुष्टीकोन मीळ्तो. आपण आपल्या विचार
मंथनात कुठे कमी पड्लो ते कळ्त.आणी विचार आणखी प्रगल्भ
होतात.आभ्यास पकका होतो. तुम्ही म्हणाल आम्ही कोणाला शिक्षण देण्या
साठी हा ब्लॉग सुरु केलेला नाही. बरोबर आहे ते.पण जर वाचतोच आहोत
ईतरांचे ब्लॉग तर एक – दोन ओळीचा प्रतिसाद द्यायला काय हारकत
आहे.आणी जो प्रतिसाद देवु तो मनापासुन असावा. ‘वा, खुपच छान, झकास ’
ईथ पर्यंतच मर्यादित न राहाता ‘ नाही पट्ले तुमचे विचार’, माझ्या मते
तुम्ही आमुक एक विचार परत एकदा करुन पाहा.’ असे परखड पणॆ सांगुन ते
विचार आपल्याला रुंदावता आले तर पाहावे. प्रत्येकानेच आपला ब्लॉग
मनापासुन लिहीलेला असतो.कोणीतरी वाचावा म्हणुनच. मग एखादा प्रतिसाद
देवुन आपण त्याला संजिवनी देण्यास काय हारकत आहे? या प्रतिसादानेच
प्ररीत होऊन आणखी चांगले लेख वाचकांन समोर आणतो. या
निमीत्ताने आपल्याला ही आणखी चांगले लेख वाचायला मीळ्तात. आणी
मग आपोआपच आपला ‘माराठी ब्लॉग नेट’ हा आणखी प्रगल्भ होऊन
स्वताःची उंची वाढवत जाईल. एक मेकास साहाय्य करु अवघे धरु सुपंत. असे
मला वाटते.
July 14, 2006 at 8:31 am
भारती,
तुमचा लेख वाचून ; तुमचे विचार व्यक्तिशः पटले. पण हे असे का घडत असावे याची काही कारणे माझ्या मते ही असावीत.
१) मराठी भाषा ही -ह्स्व , दीर्घ, आकार, ऊकार, काना , मात्रा वेल्यांटा यांनी तयार झाल्याने इंग्रजी टंकलेखनाएवढी सोपी नाही. शुध्द्लेखानाच्या चुका होऊ नयेत याकरता अतोनात काळजी घ्यावी लागते. असे असताना आपली अनुदिनी लिहीणे सोडून प्रत्येकाच्या लेखाला प्रतिसाद द्यायचा म्हटले तर ते शक्य नाही. कारण जवळपास ३०० अनुदिन्यांची नोंद मराठीब्लॉग.नेट वर आहे. त्यातूनही एखाद्याने मदतीचे आवाहन केले अथवा एखादा लेख ‘हटके’ असला किंव्हा खुप आवडला तर त्या लेखाला उत्स्फुर्त
प्रतिसाद मिळतो.
२) मी स्वतः मराठी अनुदिनी चालु करेपर्यंत मला मराठीब्लॉग.नेट विषयी काहीच माहीती नव्हती. माझी
अनुदिनी तिथे नोंदली गेल्याची पावती (ई-पत्र) जेव्हा मला मिळाले , तेव्हा मला याचा शोध लागला. आता मी रिकामटेकडी असल्याने दिवसातून ब-याचवेळा इथे भेट देऊन नविन काही प्रसिध्द झाले आहे ते पाहाते. त्यात एखादा नविन ब्लॉग सापडल्यास तो लगेच र्स्स मध्ये अडकवून टाकते. जेणेकरून मला त्या ब्लॉगवर प्रत्यक्ष न जाता, तिथे प्रसिध्द झालेले लेख वाचता येतील.
पण बहुतांशी लेखक नोकरी अथवा शिक्षणात गुंतलेले असल्याने हौशी लेखक आहेत. बहुतेकजणांचे आपापले गट (ग्रुप) असून ते फावल्या वेळात एकमेकांच्या अनुदिनीवर भेट देत असावेत. त्यांना कदाचित इतरही अनुदिन्या अस्तित्वात आहेत याची खबरबात नसावी.
तेव्हा आपल्या मांडलेल्या विचारांना इतरांकडून प्रतिसाद मिळेल की नाही याची अपेक्षा न ठेवता आपण लिहीत जावे. माझ्यासारखे रिकामटेकडे वाचक त्याची नोंद घेतातच पण आळसामुळे प्रतिसाद मात्र देत नाहीत.
आपल्याला चर्चात्मक स्वरूप जर अपेक्षित असेल तर त्याकरता याहू किंव्हा गुगल वर अनेक गट उपलब्ध आहेत. अथवा अनेक खाजगी चर्चासत्रे( फोरम्स ) सुध्दा आहेत. इथे सभासद झाल्यावर तुम्ही एखाद मुद्दा मांडल्यावर त्यावर अनेकजण त्यांची मते मांडतात. तुम्ही सुध्दा इतरांच्या मुद्यावर मते मांडू शकता. पण हे प्रकार अनुदिनीसारखे सजवता येत नाहीत. शिवाय मराठीतून ते मांडता येतात की नाही याबद्द्ल काही माहिती नाही. अर्थात इथे ही प्रतिसाद मिळण्याकरता लोकांपर्यंत ते पोचावे लागतात.
ता.क. आपल्या त्रिकोण या क्रमशः कथेचे पुढे काय झाले ? वाट पहात आहे.
कळावे
श्रेया