व्यवहार की संस्कार ?

July 27, 2006

आज एक मोठा घोटाळा झाला होता….नाही माझ्या हातुन नाही..हाबीब

एक्सचेंज मधुन….म्हणजे झाल काय….

आज गुरवार…बॅका आणी एक्सचेंज दुपारी एक वाजे पर्यंतच त्या मुळे घाईने

मी माझी कामे अटोपती घेत होते..हाबीब एक्सचेंज मध्ये जानुन T.T.

(Telegraphic Transfer) चा form   भरला..Beneficiary details.

भरले.अमाउंट होती.. $ 32,485.00 (USD)  ते AED tr. Dhs.

1,19333.75 आणी भारतात ती जाणार होती (INR) Rs. 15,51338.75 

हा टी.टी. मी हॉग- कॉंग च्या पार्टीने काल जी टी.टी. पाठवीले होती ती

क्रेडीट झाली असणार या बेसीस वर केला आणी बाकीची कामे करुन घरी

आले.

काही वेळाने हॉग- कॉग च्या पार्टीचा फोन आला की  शीपमेंट मद्धे

अडचणी आल्यात कनटेनर आजुन हातात न पडल्याने  त्यांनी केलेला

टी.टी. बाद झाला आहे. ती अमाउंट ते भारतात जमा करतायेत.

मी मनात विचार केला झाल अता आपली टी.टी ही  बाद झाली

असणार…थोड्या वेळात त्यांचा फोन येणारच….अता पुढच्या पार्टीच

काय करायच या विचारात मी होते…बराच वेळ गेला तरी एक्सचेंज मधुन फोन

नाही म्हणुन मी सहज चौकशी केली …तर..माझा टी. टी त्यांनी पास

केलेला…मनात विचार केला बापरे ! म्हणजे अजुन कालची टी.टी डेबीट

पडलीये हे लक्षात आल नाहीये वाटत?  नेहमीचे कस्टमर असल्याने आणी आज

गर्दीही भरपुर असल्याने स्टाफ ने एन्ट्री क्रेडीट झाली का नाही हे मेन स्ट्रीट

एक्सचेंज वरुन कदाचीत पडताळुन पाहीले नाही आणी माझी एन्ट्री क्रेडीट

दिली होती… अर्थात क्लोजींग होताना हे त्यांच्या लक्षात येणारच होत..पण

हातात त्याच्या काही राहील न्हवत..पैसे लवकरात लवकर भरा ईतकच ते

सांगु शकले असते. 

आज अर्धा दिवस…उद्या येथे सुट्टी….अता  भारतात शनिवारी हाफ

डे..रविवारी सुट्टी.. एक्स्चेन्ज सोमवारी बॅकेत कळवतील आणी मला

मंगळवारी याचे पैसे भरावे लागतील… माला ५ दिवस मीळणार

होते..म्हणजे जवळ जवळ  २८ – ३० हजाराचा फायदा… काय करावे? एकदा

विचार आला यांना विचारुन ठरवावे…. पण एक बीझनेस मॅन काय म्हणार

माहीत होत मला…  माझ्या रक्तातही हा गुण असला असता तर आज मी ही

एक प्र्याक्टीकल बीझनेस उमेन नसते का झाले…??? पण बीझनेस माझ्या

रक्तात नाही..बाबा डीफेन्स मधे…सायन्टींस..ही.त्याची मुलगी…आणी एका

 बीझनेस मॅन ची बायको…….दोघांमधे…युद्ध सुरु झाल… …मनाची

चलबीचल वाढु लागली….बांबाची  शिकवण …देश  प्रेम..?…की…बीझनेस चा

फायदा…काय कराव…फक्त  २० मी. उरली होती….निर्णय मालाच घ्यायचा

होता….आपला फायदा करुन घ्यावा हा विचार आला …आणी..मला बाबांची

जास्तच आठवण येवु  लागली…मन म्हणाल नाही …भारती…बाबांनी तुला

हे शिकवल नाही…आधी फोन करुन सांगुन टाक…एक तर …पैसे भर…नाही

तर…टी. टी..कॅन्सल कर…पण टी.टी कॅन्सल केली तर समोरची पार्टी

नाराज झाली असती…काय करावे…आणी…एकदम  भारतीच्या डोक्यात प्रकाश

पडला…आपले बॅकेत खाते आहे..त्यांना रीकवेस्ट करुन सी.सी..(कॅश क्रेडीट)

वाढ्वुन घ्यावा…. त्याचा थोडा ईन्टरेस्ट भरावा लागला तरी हरकत

नाही…मग भारतीने लगेच मुजाहीद ला हाबीब मधे पाठ्वीले…आधी झाल्या

प्रकाराची  पुर्ण माहीती फोन वर दिली…भारती बॅकेत पळाली. १० दिवसासाठी

सी.सी वाढ्वुन घेतला..आणी..हाबीब मधे जावुन पैसे भरले…हाबीब नेही माझे

आभार मानले…

माझ्या ही डोळ्यात पाणी आल होत मन म्हणत होत….बाबा….तुमची…

मुलगी …अस काही ….करणार नाही…ज्याने…ती स्वतःच्याच नजरेला नजर

नाही  देवु  शकणार . 

भारीने काय सांगीतल आल ना लक्षात? की परत एकदा सांगु दे ????


काही अठवणी – १

July 25, 2006

“आsss..वुsssssट….”                                                          

ए नाही रे,… मी आवुट नाहीच्च आहे मुळी ?…. ह्या भारीने माझ्या पाठीत ब्लॉल मारलाय, ती आत्ता या खेळात  न्हवती.” मंग्या माझ्याकेडे रागाने पाहात… .. एकीकडे  भराभर   फरश्यांचे तुकडे एकावर एक रचत होता.शेवटचा तुकडा ठेवत मोठ्याने ओरडला..”लींsssगोssर्चा”….                                                                                          

“ए…दादा…मी ह्याला  आधीच.आवुट केलय.”                                             

“गप्प…ये.. भारे…तु अत्ता खेळात होतीस का?..आणी… पळ…तु…  जा आभ्यासाला बस आधी…”                                 

“दिसतयना?… मी अत्ताच आलीये क्लास वरुन?   … त्याला एका बाजुला ढ्कलत, ” चल बाजुला हो आता माझा डाव.. .. आणी परत मला भारे म्हटल ना तर…बघ.. हं …मंग्या..फंग्या….”अस म्हणत भारतीने आपली क्लास ची बॅग कट्यावर टाकत खेळायला सुरवात केली होती. फरशांचे तुकडे एकावर एक रचत बॉल घेवुन ती मागे पळाली सुद्धा. नेम धरुन तीने तो बॉल फरशांच्या रचलेल्या ढीगावर मारला.

तेवढ्यात बांबाचा आवाज कानावर पडला..ते आईला बोलत होते..बघ ती आजुन बाहेरच,घरात तरी आली का?”ही चीन्ह मला काही ठीक दिसत नाहीत….”

बाबा घरी आहेत हे पाहुन भारती हाळुच घरात शीरली होती.आणी जसे काही नुकतेच क्लास वरुन आलोय आशा थाटात आईला म्हणाली..”आई sss….भुक लागलीये…काय केल्येस..? एकीकडे विचारात…तिने मुठ भर भाजक्या शेंगा तोंडात कॊंबल्या होत्या. नजर आजुन भीरभीरतच होती खायला काय काय आहे ? ते पाहायला.

तुझ्या आवडीची पनीरची भाजी केलीये, .आणी कैरीचा तक्कु…

तक्कु पण…अरे…वा..!  अस म्हणत तीने हाताच्या तळावर तो घेतला ही होता…. चाट..णार ईतक्यात ओरड्ली आईssssग,  काय ग?.. गरम आहे ते सांगायच नाहीस का?पोळलाना हात..! पोळलेला हात झटकत ती म्हणाली.

तु देतेस का वेळ तेवढा? पळ बेसीन खाली हात धर आधी…. भारत! हज्जारदा सांगीतलय,उतावळे पणा बरा नाही..? असच वागत राहीलीस ना..तर सासरी माझ्या नावाचा उद्धार होईल. 

“जा … हात पाय घुवुन घे…मी पोळ्या करत वाढ्तेच आहे.. आणी हे बघ ..बाबा चिड्लेत तुझ्यावर?..

का?… मी …काय.. केलय..अता..?

आभ्यासात तुझ लक्ष नाही…म्हणुन ओरडत होते…

ए..आई अस काय  ग  करतेस..रोज रात्री बसतेच ना ग आभ्यासाला..”?

हो..माहीत आहे.. चार वेळा तरी पुस्तक पडल्याचा आवाज येतो..मीच…कीती..वेळा तुला जाग केलय…

भारती पण एकदम चोरी पकडली गेली म्हणुन गप्प झाली होती ती तरी काय करणार दिवसभर शाळा, क्लास करुन थकण परत सगळे मस्त मऊ मऊ गादीत झोपले असताना हीला मात्र आभ्यासाच ओझ…

 डोक जरा जड वाटु लागल म्हणुन तीने मागे मान टेकवली..मुजाहिद च्या आवाजाने तीची तंद्री भंग झाली होती.मुजाहीद तीला विचारत होता…”मॅडम अब घर चलना है?

नही, अलनासर स्ट्रीट चलो. एच.एस.बी.सी के सामने रुकाना..
आज तीच मन थारयावर न्हवत..घरची खुप आठवण येत होती.कामात लक्ष लागत न्हवत. डोळे सारखे भरुन येत होते.कसबस तीने बॅकेची कामे आटोपली.. परत मुजाहिदला मीस कॉल
देनुन ती गाडीची वाट पाहात खाली उभी राहीली.

परत ती भुत काळात गेली होती. ”ए आई मी जरा चक्कर मारुन येते ग..
आई मागुन ओरडत होती अग अत्ता तु म्हणालीसना आभ्यासाला बस्तीये ?
हे ऐकायला ती होती कुठे घरात? पायात स्लीपर चढ्वुन ती जीन्या पर्यत पोहचली सुद्धा..
ए.. काय.चाललय  ग..?मंजुला एका बाजुला दाबत ..स्वताःसाठी जागा करुन घेत मी विचारल
काही नाही ग…ताई गोष्ट सांगतीये..
ए कोणती?
भुताची..
भुताची…???.. ए..ए..मला ऐकायचीये..परत सांग ना?
नाही. तु  उशीरा का आलीस..अत्ता पर्यत ताईने ..निलेश साठी..आणी..शामी..साठी अशी दोनदा सांगुन झलीये.
ए ताई परत सांग ना ग!
सरिता ताई दयाळु. ती परत माझ्यासाठी गोष्ट सांगणार तेवढ्यात..मंजी तड्मडली..ए  थांब,तु नको..आजुन रंगवत सांगायला १५ मी. घेशील
मीच सांगते..एक बाई असते..ती आपल्या मुलाला घेवुन स्मशाणातुन जात असते.तर मागुन तीला आवाज येतो.. झाली….बस्स…!!!!…
हं सांग ग ताई अता पुढे काय होत… ‘ए भारती तुझ डोक काढ मधुन मला ताई दिसत नाहीये…
मी थोडस बाजुला झाल्यासारख केल तर मंजी माझ्यावर खेकसली
ए काय ग ..मध्यच येवुन तु सरळ सरळ माझी जागा हाडपलीस….मी बघ कीती कोपरयाला आलीये..
श्युssssss…. ए ही भारी आली ना की खुप गोधंळ घालते.’
तु जा.. ग… आभ्यासाला बस..
ए ..ए…तुम्ही लोकांनी कय चालवलय ..ग..? माझ्या आभ्यासाच्या..मधे पडायची गरज नाही हं..सांगुन ठेवय्ते….!
झाली का यांची भांडण सुरु..?..
सगळ्या गोष्टीची वाट लावलीये…नुसती..

आणी मला हासु येत होत.मुजाहिद गाडीची चावी हातात देवुन गेला सुद्धा. मी फ्रीज मधुन पाण्याची बॉटल काढली.गार पाणी प्याले….काही खाण्याची ईच्छा न्हवतीच..बेडरुम मद्धे जाउन  डोळे मीटले. मीटल्या डोळ्यातुन गरम पाणी ओघळु लागल..बाबांची खुप आढ्वण येत होती. त्या दिवशी….

त्या दिवशी सगळे स्विमींगला निघाले होते मला ही जायच होत पण बाबा या दिवसात जावु देणार नाहीत माहीत होत.तरी ट्राय करु
म्हणुन मी जरा घाबरतच विचारल…
‘बाबा सगळे स्विमींगला चाललेत मी पण जावु? उत्तर काय येणार हे मला माहित होत.
‘नाही..तुझा क्लास नाही का?
‘तो तर झाला सकाळीच..आणी अता फक्त दिड तासात परत येणार आहोत.
‘म्हणजे जायच आधीच पक्क केलेल दिसतय?’
‘नाही हो बाबा तस काही नाही.. बर जाउदे मी नंतर कधी जाईन.’ म्हणत मी आतल्या रुम मध्य गेले..माझे डोळे भरुन आले होते..
बाबांना हे पक्क माहीत होत.. मी रडलेल बाबांना सहन व्हायच नाही..
कोण कोण चाललय?
सुन्नी.मंग्या..मंजु..दादा.निलेश. मनिष. आणी मी.. एकदम जीभ चावत मी म्हणाले ..नाही म्हणजे तुम्ही परवानगी दिली तर..! बाबा लगेच हासले होते.
जा.. पण दिड.. दोन तासात या.. आणी शॉवर घेतल्यावर डोक नीट कोरड कर..नाही तर परत सर्दीने आजारी पड्शील.बाबांचा काळ्जीचा स्वर उमटलेला.
‘नाही ओ बाबा काही काळजी करु नका..’अस म्हणत मी सॅग घेवुन पळाले सुद्धा. तयारी मी आधीच करुन ठेवली होती.
ए ..आले का सगळे..?
नाही ग मंजी नाही आली अजुन..
बर तुम्ही पुढे जा मी आलेच तीला घेवुन.. मंजु पण मी जाई पर्यत तयार झालेली.फक्त काकुला मस्का मारायचा बाकी होता.त्या कामात तर भारती हुशार! काकुला कसबस पटवुन आम्ही
सायकली घेवुन शीवरकर गार्डन कडे पळालो.
पाण्यात बराच वेळ खेळल्यावर कोणी तरी म्हणाल होत…
ए पाण्यात श्वास रोखुन कोण जास्त वेळ बसु शकत ते पाहु?
हो.. हो..चला…सगळ्यानी एक दिर्घ श्वास घेतला नाक मुठीत धरल..
एक….दोन….तीन….स्टार्ट..
सगळेच पाण्याखाली गेले….थोडा वेळ गेला ..एक..एल..आवुट होवु लागला.. माझाजीव ही गुदमरु लागला. आणी तेवढ्यात दादा म्हणाला
ए भारी जिंकली..तेच ऐकण्यासाठी मी एवढा वेळ तग धरलेला..लगेच वर येवुन मी मोठ्ठा श्वास घेतला आणी जिंकण्याच्या मुड मद्धे बोलले..
मग   भारी..भारीच..आहे मुळी.. कायम पहीला नंबर मीळवते म्हटल…!
हो.. पण…आभ्यास… सोडुन..
ए काय रे?… आता मार खाशील हां.. निलेश..त्याच्या अंगावर पाणी फेकत मी ओरडले होते..आणी सगळे ही..ही करुन हासत होते.
‘बर..चल ..तुला डावुट आहेना..परत एकदा करु..यात.. सगळ्यांच्या मते हा प्रयोग परत ठरला..
अता माझा जीव आधीच दमलेला होता पण हारायच न्हवत..माझा श्वास कोंडु लागला..शरीरात  भरलेला श्वास अत्ता फुटुन बाहेर पडेल अस वाटु लागल होत.
आणी सगळ्यांच्या टाळ्याचा आवाज आला.. दादा म्हणत होता..भारी उठ ..अत्ता पण तुच जिंकलीस..

भारतीच्या डोळ्यातुन अश्रु जास्तच वाहु लागले..हो.. हो..मी जिंकले…,…जिंकले…होते… मी…. खरच ……..!!!!!  

क्रमशः…..


‘नाम्याची आई’.

July 25, 2006

‘नाम्याची आई’ ही गहाळ झालेली माझी आवड्ती आवृत्ती काही थोर व्यक्तींनी मीळवुन दिली,त्या बद्दल नम्र होत मी ही त्यांना  अर्पण करीत आहे.

आज आपल्या भारतात हजारो स्त्रियांच्या आयुष्याची रोजची पाहाट अशीच उगवत असते. कींवा याही पेक्षा वाईट. त्यात आणखी मोठ मोठी संकटे पण येतात ती वेगळीच.प्रत्येक परीस्थीला  मोठ्या हिमतीने…धीराने…त्या सामोरे जातात.त्यांच्या त्या मनोबलाला माझे शत.. शत…प्रणाम…..

‘’आई,खायला काय हाय का ग?”’नाम्याने आईला विचारत खाली बस्तान ठोकले.” त्याच्या आईने चुलीवर भाताचे आधाण ठेवले होते.
भात शिजला का ते पाहात तीने विचारले, ‘’कार; राजा, यई भुक लागली व्हय?, झाल बग, वाईच थांब. अत्ता वाढ्ते बघ.”
नाम्यान आईने काय कायकेलय याचा अंदाज घेत विचारल ”काय केलेल हाय?”’

तिला ह्या प्रश्नाच उत्तर द्यायला जड जात होत.पण ती कसबस बोलली,” वांग्याच कालवण आणी भात.”ते ऐकताच नाम्या फणफणत बोलाला,
’मला नग ते, रोजरोज कलवण आणी भात.” तु दुसर कायबी करत नाय.येवुन जाउन तेच तेच खावु घालतीया.मला आज भाकरी…
नाय…., ती पण ईतकी नाय आवडत …मला आज चपाती आणी भेंडीच कालवण पायजे.त्या शेजारचा बंड्या कड बग जरा, कसा राहातुया….
..कीती चांगली कापड आणतीया त्याची आय…शाळला येताना कसा रुबाबात येतोया… आणी… मास्तरान सांगितलेली सगळी पुस्तक पण हायती त्या
कड…..मला आपल एक….. दोन पुस्तकावरच पाठ्वतीया..शाळेचा गणवेश पण फाटलया…. मला लाज वाट्तीया आय… तुला कस गं नाय
कळत..?.. ”’

ते ऐकुन त्याच्या आईचा जीव एकदम कासावीस झाला. तीला आपल्या पोराच्या गरजा कळ्त होत्या. पण तीचा पण नाईलाज होता. ती दहा घरची
काम करत होती. हाजार बाराशे रुपायात कसबस घर चालवत होती. नाम्याचा बाप दारुडा. रोज दारु पीवुन धींगाणा घालणारा.दोन वेळ्च पोटात तर
टाकाव लागत.त्यात नाम्याच शिक्षण. खर्च झेपत नसतानाही तीने नाम्याला जरा बरया पैकी शाळेत घातले होते.शाळेच्या फीया ही तुंबल्या होत्या.
नाम्याचा मास्तराने दोन दिवसापुर्वीच तीला बोलवण धाडल होत.कशाकरता हे तीला माहीत होत.पण वरचे पैसे आणणार कुठुन? नाम्यासाठी ताटात
कालवण आणी भात वाढता वाढता तीने मनाशी ठरवल. उद्या कसही करुन उसने पैसे घेवुन नाम्याच्या काही गरजा तरी पुरवायच्या.आणी मग ती
आपल्या लाडक्या पण तोंड फुगवुन बसलेल्या मुलाची समजुत काढ्त त्याला भरवु लागली.

आज नाम्याची आई नेहमी पेक्षा जरा लवकरच उठली. मुलगा,बाप,आणी स्वता:च्या ड्ब्यासाठी पटापट स्वंयपाक केला. मग नाम्याला उठ्वल.एकी
कडे अंघोळीसाठी त्याला पाणी गरम करायला ठेवल.मग पाण्याचा हांडा घेवुन ती बाहेर पाणी भरायला गेली. २-३ हंडे पींपात ओतुन झाले तरी नाम्या
अजुन उठला न्हवता. मग परत उठवत ती बोलली.’अरं कीती येळा उठवायच तुला..?.. अता उठ बेगी…नाय तर.. दणका दिलाच बघ..
त्याला ही माहीत होत . दोन तीन आवाजा नंतर दणका मीळेलच.. म्हणुन तो लगेच म्हणाला.. ”मी जागाच हाय.. पण म्या आज नाय
जानार..तीथ मास्तर समदया मदी मला उभ करुन ईचारतात… दोन महीन्याची फी आजुन आली नाई…दोन दिसात भर. नाय तर तुझ्या आईला
बोलवलय म्हणुन सांग…. मला नाय आवडत ते. तु पैस दे. मग म्या जातु.”’ ते ऐकुन तीला अगदी भरुन आल. भरलेले डोळे हाळुच
पुसत ती त्याच्या डोक्यावरुन हात फीरवत बोलली. ‘’नाम्या… मला सांग मला काय कळ्त नाय का रं… दिवस भर राबुन… पण.. कसबस
भागत… दोन म्हईन्यापासुन तुजी फी जमोती हाय… काय न काय खर्च येवुन खर्च होतीया.. हे बग राजा.. आज तु जा. मी काय बी बंदुबस्त
करुन उद्या देतेच बग….”

नाम्या जरा नाखुश होउन शाळेला गेला. मग स्वताच पट्पट अटपत तीन नवरयाला उठवायला सुरवात केली.” आव.. .उठा आता….दिस
डोक्यावर आलाय.. आन तुमी पड्लाय अजुन.. येळ्वर कामाला नाय गेला तर ही बी नौकरी जायची हातची.. ‘’ तो काय जागचा हालत नाही
ते पाहुन तीला अजुनच राग आला. चीढुन त्याच्या डोक्यावरची चादर बाजुला करत परत बडबडायला लागली..” कीती येळा सांगुन झालया..
कामावर लवकर जाव…अस दांड्या मारुन मग पैस कमी मीळत्याती.. त्यात तुमची दारु.. वाट लावतीया पगाराची… नाम्याची फी तुंबलीया..
आननार हाय का पैस..म्या कुठ ..कुठ बघु बाय मानुस.. तरी घर म्याच चालवतीया..” तीच्या तोंडाचा पट्टा अता थांबणार नाही,हे पाहुन
तीचा नवरा पण तीच्या वर खेकसत बोलला”’ झाली का तुझी वटवट सुरु? … सकाळी सकाळी अस ओरडाया मी तुझ्या बा चा नैकर हाय वै ग..?”
सकाळी अशी टाळक्यात घुसु नग..नायतर दोन ठेवुन देतुया बग…” हे ऐकुन ती जरा मागे सरकली. तीला माहीत होत.. आता आजुन जर
जास्त बोललो तर.. दणके आहेतच. ‘’काय….करायच ते करा.” अस बोलुन ती आपल्या कामावर निघाली.

दाराबरची बेल वाजवली. दार उघडे पर्यंत तीने स्वताची साडी नीट करुन घेतली.मग दार उघडल. “काय आज अगदी वेळ वर आल्यात बाईसाहेब.”
घ्रर माकणीचा टोमणा आपल्याच आहे हे माहित आसुनही उगीच हासत रोजची काम तीने हातात घेतली. एकीकडे काम भराभर आवरत असताना ती
विचार करु लागली, कसा पैशाचा विषय काढु? पण तीला भागच होत विचारण. शेवटी मनाच धाडस करुन तीने बोलायला सुरवात केली.”
वईनी झाली बगा काम. साहेब नाहीत न्हव.”’ ते नाहीत याची खात्री करत मग तीने परत सुरवात केली.”’मला वाईच पैशाची नड होती बगा.
नाम्याची फी भरायची हाय. शंभरच्या चार नोटा पाहीजेती.” ते ऐकुन तीची मालकीण लेगेच म्हणाली. काग ग? मागच्याच महीन्यात तु जास्त
पैसे घेतले. अता परत नाही देणार.तुझ दर दोन चार महीन्याने चालुच असत.आणी तु दर वेळी माझ्याच कडे का मागते? दुसरे काय तुला दिसत
नाही? का तीथे पण असच मागत बसते? ” ते ऐकुन तर तीला जाम दडपण आल. पडलेल्या चेहरयाने कसबस ती बोलली”’ बाई मला काय
आवडत व्हय उसन मागाया? लईच नड हाय म्हणुव मागतीया. आनी दर महीन्याच घ्याना कापुन.”
तीचा पडलेला चेहरा पाहुन कदाचीत तीच्या मालकीणीला पण दया आली असावी. नेहमी नेहमी असे उसने पैसे मागणार नाही या वाद्यावर तीने पैसे मीळवले.
बाकीच्या घरची कामे ती पटापट करीत होती.

दुपारची वेळ टळुन गेली होती. अता तीला घरचे वेध लागले होते. नाम्या घरी केव्हाच आला असेल. सकाळ्च केलेल हातानेच वाढुन घेत नाक मुरडत
कसबसे त्याने दोन घास गीळ्ले असतील.नवरयाचा काही अजुन पत्ता नसेल. कामावरुन तो तसाच दारुच्या अड्यावर गेला असनार. या विचारात तीची
पावले झपाझप घरच्या दिशेने पडत होती. वेळेवर पैसे मीळाल्याने ती बरीच खुश झाली होती. कधी जाउन नाम्याला सांगते अस तीला झाल होत.

घरी आल्या आल्या तीने पैसे देवळीत ठेवले.आणी लेगेच तीला आठ्वल दोन तीन वेळा आसेच देवळीत ठेवलेले पैसे नवरयाने उडवले होते. जास्तीची दरु
पीवुन त्याने केलेली भांडण,मारामारी,शीव्याशाप…..तीच्या मनात त्याच्या बद्द्ल तीरस्काराची भावना तरळुन गेली.एक उसासा टाकत आधी तीने
ते पैसे तांदळाच्या डब्यात रोवुन ठेवले.

नाम्या तीला दिसला नाही.तो बाहेत खेळत असेल असा विचार करुन ती हात पाय स्वच्छ धुवुन,पदर सावरुन संध्याकाळ्च्या स्वंयपाकाला लागली. बराच
वेळ झाला तरी नाम्याचा अजुन पत्ता नाही पाहुन परत तीचा पारा चढायला लागला. ती मग त्याला पाहायला बाहेर गेली. नाम्या बाहेर गोट्या खेळत
बसलेला पाहुन तीला अजुन राग आला. त्याचा कान पकडत तीने त्याला उभे केले.”’नाम्या …. काया..रं .. ईथ .. खेळत बसलाया…
अन आभ्यास कोन करनार हाय…?…आधी घरला चल.. फेक ते गोट्या…” नाम्या पण मुकाट्याने घ्ररी आला. तीला आभ्यासातल काही कळत
न्हवत पण तीने दोन तास त्याला आभ्यासाला बसवल..मध्येच त्याची जरा चुळ्बुळ सुरु झाली की त्याला दामटत होती. त्याचा आभ्यास चालला
असतानाच त्याचा बाप कोणाशी तरी भांडत असल्याचा तीला आवाज आला. बाहेर जाउन पाहाते तर तो पुर्ण दारुच्या नशेत झिंगलेला, कोणालातरी
हातवारे करीत शिव्या हासडत होता. त्याला त्या आवस्थेत पाहुन ती परत खुप चीडली,कसबस त्याला ओढत तीने घरात आणल.मग नवरा बायकोची
बाचाबाची सुरु झाली. नाम्या साठी हा तमाशा रोजचाच होता. त्याच आभ्यसात लक्ष लागेना.त्याने तो आटोपता घेवुन आईला जेवायला वाढायला
सांगीतल. मग नवरयावरच लक्ष काढुन घेत नाम्याला, नवरयाला वाढ्ल, जेवुन सगळी सावरासावर करुन थकुन ती जरा भींतीला टेकुन बसली.थोडा
वेळ असाच गेला आणी तीला मळ्मळु लागल. थोड्या वेळाने परत कोरड्या ओकारया येवु लागल्या. “अलीकडे दोन चार दिवसापासुन अस का होतया?”
हा विचार करु लागली, आणी एकदम डोक्यात आल तीच्या, ”जीवात जीव आलाय……” त्या जाणीवेन तीच मन एकदम मोहरुन आल….
पण….. लगेच तीचा चेहरा पडला. ” काय कराव?…. घराची अशी तीन तेरा, नाम्याचच शिकण झेपेना, त्यात हे दुसर पोर……तो
तसा दारुडा… दुसरया कुनाचा आधार नाय….जाव का उद्या डाकटर कड…?”विचार करता करता तीची नजत नाम्या कडे गेली. नाम्या शांत झोपला होता.
त्याचा निरागस चेहरा पाहुन तीच उर भरुन आला.त्याच्या केसातुन हात फीरवत परत विचारात गर्क झाली…” हे एक होऊ द्याव. नाम्याला खेळाया एक
भईन मीळल.तो पार एकटा पडतुअया. पैशाच काय… अजुन दोन काम जास्त करु या.. पण या जीवाला अस माराया नग… दोघासनी संभाळ्तुया….
आता तीघासनी संभाळु…पण त्याला आपुल्या म्होर कोनी तरी पाईजया…” विचार करताना तीचा हात नकळ्त तिच्या वाढलेल्या पोटावरुन प्रेमाने फीरु लागला.
चेहरयावर मायेची दाट छाया पसरु लागली..विचारात दंग असताना मागुन नशेत झिंगलेल्या नवरयाचा आवाजाने तीची तंद्री भंग झाली.तो तीला बोलवत
होता.”’ईकड य्य..”’ त्यावर तिरस्काराने बघत ती म्हणाली…. “नाय. झोपा गुमान…”

एवढ बोलतेना बोलते तोच तिच्या डोक्यात एक जबरदस्त कळ आली. मागुन तीचा नवरा तीचे केस ओढ्त होता. आणी एका हाताने तीचा हात तो
मगच्या बाजुला पीरगळु लागला होता. तीला असाह्य वेदना होऊ लागल्या…. डोळ्यातुन अश्रु वाहु लागले……पण शेवटी तीची तकद त्या पुढे कमीच
पडली. तीच शरीर एकदम शीथील झाल….निःप्राण….. त्यात काही जीवच उरला न्हवता….चेहरा अगदी निर्वीकार…..काळवंडला होता.
फक्त तीच्या डबडबलेल्या डोळ्यात एकच विचार दिसत होते…… नाम्या पैस कुठ हारवुन बसला तर…?….. उद्या त्याची फी भराया आपुनच जाव का?…


त्रिकोण

July 22, 2006

तो एका मोठ्या कंपनीत कामाला होता. लहान पणापासुन चाकोरी बद्ध जीवन जगत आलेला.शाळा , कॉलेज मध्दे अतीशय हुशार मुलांमध्ये गणला जाणारा. वकृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धेत कायम चमकणारा.त्याच्या सुंदर व्यक्तीमत्वात या सगळ्या गोष्टी कायम  भर घालीत.त्यामुळे साहाजीकच सगळ्यांचा आवड्ता. कंपनीतही त्याची अशीच छाप पड्लेली.तो ग्रुप मध्दे सगळ्यांचा लाड्का होता.  कोणत्याही विषयावर तो बोलु लागला की सगळी मंडळी मंत्रमुग्ध होऊन ऐकत असत.

त्या दिवशी अशीच सगळी मंडळी कॅन्टीन मध्दे जमलेली होती. वाफाळलेल्या कॉफीचे घोट घेत तो कुठ्यातरी विषयावर बोलत होता.आणी बाकीचे “बरोबर बोललास हो अगदि.”म्हणुन दाद देत होती.तेवढ्यात एकदम त्याचे मुद्दे खोडुन काढ्त “ती” बोलु लागली.खुप मनापासुन….. मुद्देसुद ती आपले विचार मांडत होती. सुरवातीला तो ही तीची प्रतिभा पाहुन प्रभावित झाला. सगळे तीचे विचार मन लाउन ऐकु लागले.त्याला अशा गोष्टीची सवय नसल्याने मनातुन थोडा चीड्ला.पण तरीही आज खरच चर्चा रंगली म्हणुन आनंद ही झाला. त्याने तीला या आधी कधी ग्रुप मध्दे पाहीले न्हवते. सहज चौकशी केल्यावर कळ्ल ती त्यांच्या कंपनीत नुकतीच जॉईन झाली आहे.  त्यादिवशी रात्री त्याला काही झोप लागेना. आजचा हीचा हा विषय आवड्ता होता म्हणुन ही ईतक बोलली की खरच ही चर्चा बाहाद्दुर आहे? हे त्याला जणुन घ्यायचेच होते. त्याला तीच्याबद्दल ईर्षा झाली होती.त्या रात्री काही क्लीष्ट विषय त्याने मनात विचार करुन ठेवले.आणी मग त्याला शांत झोप लागली.

परत दोनचार दिवसातच कॅन्टीन मध्दे त्यांचा तो ग्रुप जामुन आला अर्थात ती त्या ग्रुप मध्दे होतीच. तीला पाहुन कधी चर्चा सुरु कारतो अस त्याला झाल होत. सगळयाना घरी जाण्याची घाई होती, तरी ” जाशील रे, ही कॉफी तर घे.” म्हणत सगळ्यांना त्याने कॉफी मागवीली. कोणताही विषय चर्चेस नसताना ओढुन ताणुन त्याने तो क्लीष्ट विषय काढलाच. विषयाची माहीती बरीच असल्याने तो बरच काही बोलु लागला. परत सागळॆजण त्याला दाद देवु लागले. पण आज त्याच स्तुतीवर्षावावर मुळी लक्षच न्हवत,त्याची नजर फक्त तिच्या प्रतीक्रीयेवर होती, त्याला जणु खात्रीच होती की आजही  आपल्याला दाद दिल्याशीवाय राहाणार नाही. पण झाल अगदी उलट. तीने त्याचा विषय नीट समजावुन घेतला. मनात मुद्दे तयार केले, आणी तो बोलण्याचे थांबताच हिने आपले विचार मांडायला सुरवात केली.याही विषयावर ती भरभरुन बोलु लागली. तीच्या, प्रत्येक शब्दांवर जोर देत मुद्दे मांडण्याचा हातोटीच सगळ्यानी तोंड्भरुन कौतुक केल. पण या कौतुकाने ती भारावुन गेली नाही.आपले सगळे विचार मांडुन झाल्या वर ती परत आगदी शांत बासुन राहीली. स्वताची मत मांड्ताना अगदी उफाळुन बोलणारी ” ती”  आणी आत्ताची अगदी निर्वीकार चेहर्यातली ”ही”. त्याला काहीच कळॆना. तो मनातुन खुप अस्वस्थ झाला. त्याच लाड्वलेल मन हीच्या समोर हार मानायला तयार न्हवत.घरी जाण्याच्या ओढीने सगळेच उठ्ले,त्याला अजुन वाद घलुन आपलच म्हणन खर करायच होत,  मग नाईलाजाने तो ही उठला. रस्त्यात तो फक्त तीचाच विचार करीत होता.घरी आल्यावर,जेवताना,झोपताना त्याला फक्त तीची चर्चाच अठऊ लागली. बोलताना तीचे हावभाव,आवाजातील चढ उतार, बोलताना मधे मधे चेहर्यावर येणार्या केसांना मागे सारण्याची तीची विशीष्ट पद्धत, मधुनच डोळे मोठे करुन,सगळ्यांवर टाकलेला कटाक्ष, कीती आणी कीती तरी गोष्टी.

आता मात्र तो रोजच त्या ग्रुप मद्धे येउन बसु लागला,कॉफीचे घुटके घेत घेत तीच्याशी चर्चा करु लागला.ग्रुप मद्धे आसुनही ही दोघे एकटेच कोणत्याही विषयावर चर्चा करु लागली.नंतर नंतर कोणी असो नसो यांच्यातच गप्पा सुरु झाल्या.एखाद्या दिवशी तीने ऑफीसला दांडी मारली की हा अस्वस्थ होऊ लागला. थोड्या फार फरकाने तीचीही अवस्था त्याच्यासारखीच झाली होती. त्याचा बरोबर तांसतास ती बोलत राही.त्याच्या रुबाबदार व्यक्तीमत्वाने तीला ही भुल पाडाली होती. ग्रुप मध्दे आता ती चर्चेचा विषय ठरु लागली होती. एव्हाना त्याला कळुन चुकले की आपल्या आभ्यासाची भुक फक्त हीच भागवु शकते,हीच्याशी बोलल्याने जे समाधान आपल्याला मीळते,ते ईतर कशातही नाही. तो मग खुपच अस्वस्थ होतो.रात्र रात्र त्याला झोप लागेनाशी होते. सतत तीचेच विचार मनात घोळू लागतात. डोळे मीट्ले तरी तीचाच सुंदर चेहरा त्याल दिसत असतो. तीचा विरह ईतका असाह्य होतो की, डोळ्यातुन न कळत अश्रु वाहु लागतात.  मन त्याला सांगत असत…. हीच ती… जीची तु वाट पाहात होतास….हीच तुझ आयुष्य पुर्णत्वाला नेउ शकते,…. हीच्या शीवाय तु अर्धवट आहेस…. पण…. पण.. आता हे काहीच शक्य नाही. तु खुप उशीर लावलास गं यायला….मी तुझा अता नाही होऊ शकत ….त्याच्या या अगदीगतेचा त्याला खुप राग येतो.. हाताच्या मुठी घट्ट आवळ्त अश्रुनां तो मोकळी वाट करुन देत असतो. त्याच्या शेजारीच  शांत झोपलेल्या त्याच्या बायकोला या घोंगावण्यारया वादळाची काहीच क्लपना नसते. तो एक नजर तीच्या चेहर्यावर टाकतो. तीच्या बाहुपांशाचा विळ्खा अलगद सैल करत दुसर्या कुशीवर वळतो.मनात एक ध्द्रुड निश्चय करुन झोपण्याचा उगाच प्रयत्न करीत राहातो.

मन खुपच उदास असते,कुठल्याच कामात त्याचे लक्ष लागत नाही.मग मनाशी काहीतरी पक्के ठरवुन तीला फोन करतो. दोघांच भाहेर भेटायच नक्की होत.असा फोन आपल्याला कधीतरी येणारच होता हे तीलाही माहीत असत.भेटण्याच्या ठीकाणी जायला ती जरा लवकरच नीघते,तीच्या श्वासांचा वेग वाढलेला असतो,आजुबाजुच जग ती विसरते.कुठल्याश्या धुंनदीत ती त्या जागी पोहचते. पाहातेतर तो तीच्या अगोदरच तेथे आलेला असतो. त्याला पाहुन ती जाम खुश होते.ज्या शब्दांची ती वाट पाहात असते ,आज ते शब्द त्याच्या ओठातुन बाहेर पडनार असतात. ठरल्याप्रमाणे कॉफीची ऑर्डर देवुन तो तीच्या नीरागस चेहर्या कडॆ एक नजर टाकतो….तीचा तो गोड,अधीर चेहरा पाहुन त्याचे डोळॆ भरुन येतात. पण कधीतरी यावर त्याला बोलावच लागणार असत. जड मनाने तो विषय काठतो. मी…. मी…तुला एका गोष्टी बद्दल कधी बोललो नाही…. म्हणजे तसा कधी विषयच निघाला नाही….. सुरवातीला मी फक्त तुझ्याशी गप्पा मारायचो…. तुझ्याशी वाद घालायला मला खुप आवडायच….हळु हळु मी तुझ्यात गुंतत जाऊ लागलो.तुझ्या बद्दल माहीत नाही …पण….” ती ही खुप आधीर होऊन हे सगळ ऐकत असते.मनातुन जाम खुष असते. मनातल्या मनात म्हणत असते माहीत आहे मला. पुढे बोल, जे ऐकण्यासाठी माझे कान तरसले आहेत. आणी मग तीच्या कानावर ते शब्द पडतात….”माझ लग्न झालय. त्या मुळे  तु माझ्यात गुरफटु नये.जे माझ्या बाबतीत घडतय ते तुझ्या …… तीला पुढ्चे कोणतेच शब्द ऐकु येत नसतात.डोक्यात कोणीतरी जोरजोरात घाव घातल्याचा तीला भास होत असतो…मन एकदम सुन्न होत. … डोळ्यातुन घळ्घळ अश्रु वाहु लागतात….तीच शरीर पुर्ण स्तब्द होत…अंगात काही त्राणच उरत नाही.तीचे पायही थरथरत असतात. अश्याच आवस्थेत ती तेथुन उठते.आपण एक पाउलही पुढे टाकु शकत नाही अस तीला वाट्त, पण आधार मागायचा कोणाला? जो आपला वाट्ला तोच अता परका झालेला असतो. सतत वाहाण्यारया अश्रुंना अवरत घरी पोहचते.घ्ररी गेल्यावर मात्र तीचा बांध फुटतो. खुप खुप ती रडुन घेते. ३ – ४ दिवस ती ऑफीस मद्धे पण जात नाही.खाण्या-पीण्यातुन तीच लक्ष उडालेल असत. सगळ्याचा एकत्रीत परीणाम म्हणुन तीला खुप ताप चढतो.

येथे याची पण स्थीती तशीच असते. ती ऑफीसला येत नाहीये पाहुन खुपच बेचैन होतो. तीला भेटायला जाउ का नये..याच विचारांमध्दे असतो. स्वतःच्या निर्णयावर आपण ठाम राहु की नाही याची त्याला शास्वती नसते. आणी तेवढी सदसद विवेक बुद्धी जाग्रुत असल्याने तो जाण्याचे टाळ्त असतो.असेच ५ – ७ दिवस उलटुन जातात. ती अजुनही कामावर आलेली नसते.शेवटी चौकशी अंती कळत ती अजुनही आजारीच आहे. मग मात्र त्याला राहावत नाही. तो एक s m s   करतो.”तु कशी आहेस? ऑफीस मदधे ८ दिवस झाले आली नाहीस.”

घ्ररी ती त्याच्याच विचारात पड्लेली असते.आणी तीतक्यात मोबाईल वाजतो.ईच्छा नसतानाही ती तो SmS  उघड्ते. त्याचा मॉसेज पाहुन तीला खुप आनंद होतो.आणी डॊळ्यातुन नकळ्त आश्रु वाहु लागतात, परत त्याला काय उत्तर द्यावे ,याच विचारात ती असते.कारण हीच वेळ दोघांच्याही परीक्षेची असते.आधी फक्त आपलाच वाट्णारा तो आता तीला परका झालेला असतो. येथे अजुन उत्तर येत नाही म्हणुन याची ही बेचैनी वाढ्त चाललेली असते. शेवटी बराच वेळ वाट पाहुन तो तीला फोनच करतो. परत मोबाईलची रींग वाजते तेंव्हा ती फोन घेते.ईतक्या दिवसानंतर त्याचा आवाज ऐकुन तीचा बांध फुट्तो.ती फोन वरच रडु लागते. आता मात्र त्याला धीर धरवत नाही.आपली गाडी काढुन तो सुसाट वेगाने तीच्या घरी जाण्यास नीघतो. वाटॆत अनेक वीचार मनात येतात… तीला समजवुन परत तीची गाडी रुळवर आणु …  वैगेरे. एव्हाना तीच घर येत. गाडी पार्क करुन तो वर जातो दार बंद असते. बेल वाजतो. एकदा…..दोनदा….. तीनदा…. ती दार उघडे पर्यंत पण याला धीर नसतो. ती कोण बेल वाजवतय म्हणुन दार उघड्ते.समोर याला पाहुन  परत ती रडु लागते.तीला सावरण्यासाठी तो तीचा हात पकड्त बेड वर नेतो. तीच्या अगांत चांगलाच ताप आहे.हे त्याच्या लक्षात येत.कसेतरी समजवुन तीला डॉक्टर कडे घेवुन जातो,परत येताना सगळी औषधे  घेवुन येतो.तीला नीट झोपवुन तो तेथुन नीघतो. रात्र भर त्याला झोप लागत नाही, ”आपल्या मुळे आज तीची ही अवस्था झाली.या परक्या गावात तीच कोणही नाही. अशा स्तीथीत कोण पाहील तीला? ”

दुसरया दिवशी सकाळीच उठतो. ऑफीसला जायला नीघतो पण गाडी आपोआप तीच्या घरच्या दिशेने वळते…. एव्हाना तीचा तापही कमी झालेला असतो,डोळे मात्र रात्र भर रड्ल्याची चुगली करीत असतात.याला परत घरी आलेल पाहुन तीला खुप आनंद होतो. तीचा ताप गेला की नाही पाहाण्यासाठी तो आपला हात तीच्या कपळावर ठेवतो. त्याच्या त्या पहील्या स्पर्शाने तीचा कणनकण मोहरुन उठ्तो.तीचे डॊळॆ आपोआप बंद होतात. तीचा ईतका सुंदर चेहरा पाहुन त्याच्याही ह्रुदयाची धड्धड वाढ्लेली असते. आपण जीच्यावर ईतक प्रेम करतो तीला जवळही घेवु शकत नाही…. ही असाह्यता त्याच मन पोखरुन टाकते. त्याला कळ्त आता ईथे थांबलो तर स्वताला आवरण शक्य नाही…. आणी मग तो पट्कन आपला हात मागे घेत जाण्यासाठी वळतो. त्याला जाताना पाहुन ती ही बेचैन होते.मागचा पुढचा विचार न करता धावत जाउन त्याला मीठी मारते. तीचा अवेग पाहुन त्याला ही राहवत नाही.तीला जवळ घेवुन तीच्यावर तो प्रेमाचा वर्षाव करत असतो.आणी ती त्यात न्हाउन नीघत असते.आणी मग अचानक तीला जाणीव होते. हे चुकीच आहे.ती चटकन त्याच्या पासुन दुर जाते.त्याच्याही ही गोष्ट लक्षात येते . जेव्हा  तो तेथुन जाण्यास नीघतो,तेव्हा  आता परत कधीही एकमेकांना भेटायच नाही हे अश्वासन घेवुन.

ऑफीस मध्दे जातो पण सगळ लक्ष त्याच तीच्यातच असत. खर पाहाता आज तो सुखात न्हाहात असतो. झालेल्या गोष्टींची दहादा उजळणी करत स्वताच स्वताशी हासत असतो.तीच्या स्पर्शाने, तीच्या सौद्र्याने तो अगदी वेडा झालेला असतो. तीची ही अवस्था तशीच असते. मग प्रत्येक वेळी शेवट्चीच भेट म्हणत ती दोघे भेटतच जातात.आणी मग त्यांना अता कळुन चुकत की आपण आता एकमेकांशीवाय नाही राहु शकत. मग एक दिवस मुहुर्त पाहुन ४ – ५ मीत्र मैत्रीणींना घेवुन ते वैदीक पद्ध्तीने लग्न करतात. त्याने तीच्यासाठी एक नवीन फ्ल्याट घेतलेला असतो.लग्न अटोपल्यावर सगळ्यांना एक मोठी पार्टी देवुन ते आपल्या नवीन घरी जातात. आत गेल्यावर तो दार लावुन घेतो.ती आज खुपच सुंदर दिसत असते. तीला न्याहाळ्त तो तीला जवळ घेतो. आज त्यांची मीलनाची रात्र असते.आज ते सगळ्या बंधनातुन मुक्त असतात.त्याच्या प्रेमाचा प्रचंड आवेग पाहुन ती ही स्वतःला त्याच्या पुर्ण स्वाधीन करते.आज पुर्ण अर्थाने ती त्याची झालेली असते. काही काळ असाच जातो. रात्रीचे बारा साडॆबारा झालेले असतात. तो उठतो. तयार होऊ लागतो. ती त्याला विचारते “अत्ता या वेळी कुठे नीघालात?” तो खुप जड आवाजात बोलतो ”मला त्या घरी गेल पाहीजे.ती घरी एकटी आहे? तीला अजुन यातल काही माहीत नाही.”त्याची वाक्य ऐकुन ती एकदम स्तब्ध होते.डोळ्यातुन पाणी येवु लागत.कसबस ती ईतकच म्हणते ” आज आपली पहीली रात्र ना? तुम्ही मला अस सोडुन कस जाउ शकता?” तो तीला समजावुन तेथुन नीघतो.त्या दिवशी मात्र तीचे डोळे खाड्कन उघडतात.बापरे या विषयावर आपण याच्याशी कधी बोललोच नाही.अता रोजच आपण आसे एकटे राहाणार?  तीला तो आपल लग्न झालय हे काधी सांगु शकेल की नाही? आई – वडीलांशी पण नात तुट्लय. मागचे सगळॆ दरवाजे अता बंद झालेत.या चार भींतीतच आपल्याला आयुष्य काढाव लागेल का? त्याची बायको म्हणुन आपल काही स्थान असेल का?अशा अनेक प्रश्नांचा भडीमार तीच्या मनावर होत असतो. डोळ्यातुन ओघळ्णारया अश्रुंन शीवाय तीच्या हातात काहीच उरलेल नसत……

क्रमशाः……


एक खरी कहाणी

July 21, 2006

 ही कहाणी आहे, बैल नाही म्हणून पोटच्या गोळ्यांना नांगराला जुंपणाऱ्या दुर्दैवी बापाची अन्‌ हे दृश्‍य नजरेस पडल्यावर  मन  आक्रोंदुन गेलेल्या एक”बाप” माणसाची! या वास्तवाला सामोरा जाणारा शेतकरी नायक आहे भीमराव गोविंद मुळे !.. महानायक मात्र वेगळाच ! ….
..हंगाम आला. बैलजोडी नाही. जवळ पुंजीही नाही. काय करायचे? भीमराव मुळेंना ही चिंता सतावत होती. गात्रे थकलेली. उधार-उसणवारीची सोय नाही. मुलीचे लग्न याच वर्षी झाले. ६१ हजारांच्या हुंड्यासह खर्चाची रक्‍कम एक लाखावर गेली. १५ हजार कमी पडले म्हणून काळजावर दगड ठेवत बैलजोडीही बाजारात न्यावी लागली. बैल विकले. मुलगी सासरी गेली.
भीमरावांना वाटले जबाबदारीतून सुटलो; पण हंगाम आला, तो समस्यांचा डोंगर घेऊनच. पीककर्जाचे प्रकरण बॅंकेत धूळखात पडलेले. गेल्या वर्षी विकलेल्या बियाण्यांची रक्कम अजून मिळालेली नाही. भरीस भर म्हणजे, निवृत्तिवेतनावर आधीच कर्ज काढलेले. १,४०० रुपये हप्ता दरमहिन्याला कापणे सुरू होते. गावात “पत’नसल्याने सावकारही दारात उभे राहू देईना. शेती केली नाही, तर हप्ता भरायचा कोठून?…साऱ्याच समस्या. मात्र, आयुष्यभर खपलेला गडी खचणार कसा? समाजव्यवस्था आणि लोकनिंदा बाजूला सारत मुलांनी खंबीर साथ दिली. शेतात चर काढण्यासाठी भीमरावांनी स्वतः नांगर हाती घेतला. ह्रदयाला चरे पडत असतानाही दोन्ही मुलांना नांगराला “जुंपले”.यातील निवृत्तिवेतनाचा संदर्भ स्पष्ट केला, तर व्यवस्थेतील विदारकता अधिक प्रकर्षाने पुढे येते. भीमराव निवृत्त सैनिक आहेत. ते आग्रा येथे होते. देशासाठी लढणाऱ्या एका वृद्ध सैनिकाला शत्रूने नव्हे, तर परिस्थितीनेच दगा दिला. गारद मात्र केले नाही.”बॉण्ड’ संपला, आयुष्यासोबत रोजची लढाई सुरू झाली… रांगड्या नायकाला मुलांची समर्थ साथ लाभली म्हणून ठीक; अन्यथा शेतीसोबत त्यांचे आयुष्यही करपून गेले असते……अन तो आला!
अशीच एक दुपार. टळटळीत. थोडाफार पाऊस येऊन गेल्याने उकाडाही वाढलेला. शेतीत मुलांच्या सोबतीने भीमरावांची नांगरणी सुरू होती. डॉ. हिंमतराव बावस्कर कारने जात होते. विंचू आणि सर्पदंशावरील ज्यांचे संशोधन जगन्मान्य झालेय, तेच हे डॉ. बावस्कर. वैद्यकीय व्यवसायात पैसा मिळत असला; तरी डॉक्‍टरांचा शेतीवर फार जीव. गावात त्यांनी खास शेत विकत घेतले. शेतात आंब्याची लागवड करायची;  गावातून कलमा आणायला ते निघाले. रस्त्यातच भीमरावांच्या शेतातील दृश्‍य त्यांच्या नजरेला पडले. त्यांनी लगेच गाडी थांबविली. थोडावेळ दूरूनच निरीक्षण केले. डॉक्‍टर आणि त्यांची दोन मुले आलिशान कारमध्ये होती, तर भीमराव आणि त्यांची दोन मुले शेतात. रणरणत्या उन्हात. विंचूदंशावर संशोधन करणाऱ्या डॉक्‍टर बावस्करांना शेतातील दृश्‍याने तर अंतर्बाह्य दंश केला. त्यांचे काळीज गहिवरले. व्यवस्थेवर आघात करणारे हे दृश्‍य त्यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपले आणि दोन्ही मुलांसह थेट शेत गाठले. चोवीसशे रुपयांच्या निवृत्तिवेतनातून पाचसातशे रुपये हाती पडणारे भीमराव संसाराचा गाडा कसा ओढत असतील? काय करायला हवे? डॉक्‍टरांना काळजीने वेढले. घाई असल्याने ते घरी परतले. भीमरावांच्या परिस्थितीने त्यांची झोप उडाली.  सकाळी उठून त्यांनी सारी तळमळ आपल्या मित्राला कळविली. लागलीच तयारी केली आणि ते दोघेही निघाले पुन्हा भीमरावांच्या शेतात. बैलजोडी घेण्यासाठी डॉक्‍टर बावस्करांनी १० हजारांचा चेक भीमरावांच्या हाती दिला, तेव्हा त्यांची तगमग दूर झाली. एक दडपण दूर झाले होते.
नात्यापात्यातील नसतानाही एका बळीराजाची वेदना डॉक्‍टरांनी वेचली.  जुंपलेल्या जोडीचा “भाव’ करण्यापेक्षा त्याचे मोल त्यांनी जाणले. भारत महासत्ता होणार, असा डीडींम पिटणारे आणि त्या नादात आत्ममग्न असलेले स्वयंघोषित पुढारी या घटनेपासून काही बोध घेणार की नाही? डॉ. हिंमतराव बावस्कर यांच्याबद्दल अधिक सांगायचे तर, “बॅरिस्टरचं कार्टं’ हे त्यांचे चरित्र यापूर्वीच प्रसिद्ध झाले आहे. मुंबईच्या मॅजेस्टिक प्रकाशनाने ते प्रसिद्ध केलेय. त्याला पुरस्कारही मिळालेत. डॉक्‍टरांनी केलेला माणुसकीचा पुरस्कार आपल्या साऱ्यांसाठीच महत्त्वाचा. वय झाल्यावरही उमेद न सोडणारे भीमराव या कहाणीचे नायक आहेत, तर दान दिल्यावरही गाजावाजा न करता निमूट निघून जाणारे डॉ. बावस्कर महानायक. आणि हो, भीमराव गोविंद मुळे. वय ६०.  यांनी डॉ. बावस्करांची पाई पाई फेडण्याची हमी स्वतःहून दिली आहे. भीमराव म्हणतात, “”माझी उमर अजून बाकी आहे आणि माझ्या पोरांची जिद्ददेखील !”  


मला आवड्लेल ‘डॉ.अब्दुल कलाम’यांच मनोगत

July 19, 2006

जबाबदार आपणच…

 

प्रखर राष्ट्रभक्त व ज्यांची खरी वारसदार आजही युवा पिढी आहे, असे आपले राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम. राष्ट्रपतींचे तेजस्वी विचार म्हणजे युवकांचे प्रेरणास्त्रोतच आहेत. 


मित्र हो,
भारतीय एवढ्या संकुचित मनोवृत्तीचे का झाले आहेत? आपण आपले सामर्थ्य, कामगिरी का ओळखू शकत नाही? आपले राष्ट्र हे “महान’ आहे. आपल्या देशात घडलेल्या अनेक यशोगाथा आहेत, पण आपण त्यांची दखल घेतो का?
आपण दूध उत्पादनाच्या बाबतीत जगात सर्वश्रेष्ठ आहोत, रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटच्या बाबतीत आपल्या देशाचा पहिला क्रमांक लागतो. आपण जगातील दुसरे सर्वांत जास्त गहूउत्पादक राष्ट्र आहोत, त्याचप्रमाणे जगातील दुसरे सर्वांत जास्त तांदूळउत्पादक आहोत. डॉ. सुदर्शन यांच्याविषयी आपण कदाचित ऐकले असेल; त्यांनी एका दुर्लक्षित, आदिवासी खेड्याला एका स्वयंपूर्ण स्वयंचलित समूहामध्ये परिवर्तित केले. अशा लाखो यशोगाथा आहेत… पण आपली प्रसारमाध्यमे वाईट घटना, अपयश आणि संकटे यांनी पछाडलेली आहेत. मी एकदा तेल अवीवमध्ये असताना एक इस्रायली वर्तमानपत्र वाचत होतो. एक दिवसापूर्वीच “हमास’ने बॉम्ब हल्ले केले होते; पण वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर मात्र एका कष्टाळू ज्यू माणसाचे चित्र होते. त्याने पाच वर्षांत आपल्या मालकीच्या वाळवंटातील जमिनीचे हिरव्यागार वनराईमध्ये रूपांतर केले होते. देशातील प्रत्येक जण जागृत व्हावा, इतके ते चित्र “प्रेरणादायी’ होते. बॉंबहल्ल्यांच्या मृत्यूच्या बातम्या वृत्तपत्राच्या आतल्या पानांत होत्या. भारतात आपण केवळ मृत्यू, रोगराई, दहशतवाद, गुन्हेगारी यांच्याच बातम्या वाचतो. आपला दृष्टिकोन एवढा नकारात्मक का आहे? आणखी एक प्रश्‍न ः आपण एक “राष्ट्र’ म्हणून विदेशी गोष्टी स्वीकारण्यास एवढे आतुर का झालो आहोत?
आपल्याला परदेशी कंपन्यांचे दूरचित्रवाणी संचच हवेत. ब्रॅंडेड शर्टस हवेत, आपल्याला विदेशी तंत्रज्ञान हवे आहे…
सगळ्या “इंपोर्टेड’ गोष्टींकडे आपला एवढा ओढा का?
“स्वाभिमान’ हा “स्वावलंबनातून’ येतो, ही साधी गोष्टसुद्धा आपल्याला का कळत नाही?
मी हैदराबादमध्ये एका कार्यक्रमात असताना, १४ वर्षांच्या एका मुलीने मला “स्वाक्षरी’ मागितली. मी तिला विचारले- “”बाळा, तुझे आयुष्यातील ध्येय काय आहे? ती म्हणाली- “”मला, विकसित भारतात राहायचे आहे!तिच्यासाठी… नव्हे तर येणाऱ्या पिढीसाठी तुम्ही आणि मी मिळून उद्याचा भारत उभा करायचा आहे. भारत हे विकसनशील राष्ट्र नसून, ते अत्यंत प्रगत व विकसित राष्ट्र आहे, हे तुम्हीच जाहीर करणार आहात.

तुम्ही म्हणता, आमचे सरकार अकार्यक्षम आहे.
तुम्ही म्हणता, आमची नगरपालिका कचरा उचलत नाही.
तुम्ही म्हणता, दूरध्वनी चालत नाहीत.
तुम्ही म्हणता, आमचा देश कुत्री आणि रस्त्यांवरच्या त्यांच्या घाणीला कंटाळला आहे.
आपण बोलतो… बोलतो आणि फक्त बोलतच राहतो! पण आपण “याकरिता’ काय करतो?

सिंगापूरमध्ये तुम्ही रस्त्यावर सिगारेटची थोटकं टाकू शकत नाही किंवा दुकानांबाहेर उभे राहून खाऊ शकत नाही.

तुम्ही संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत ऑचर्ड रस्त्यावरून (मुंबईतल्या पेडर रोड एवढा) वाहतूक करण्याकरिता सिंगापुरी ५ डॉलर (अंदाजे ६० रुपये) मोजता.

दुबईमध्ये रमजानच्या महिन्यात रस्त्यावर खाण्याची तुमची हिंमतही होणार नाही.

तुमची टेलिफोनची बिले कमी करण्यासाठी तुम्ही लंडनमधील टेलिफोन एक्‍स्चेंजच्या अधिकाऱ्यास १० पौंडामध्ये (अंदाजे ६५० रुपये) विकत घेणे शक्‍यच नाही.

बनावट प्रशस्तिपत्रके, पदवी प्रमाणपत्रे व परीक्षेत घोटाळा करणारे मध्यस्थ तुम्ही बोस्टनमधील विद्यापीठांत वापरू शकत नाही.

… आपण अजूनही फक्त एकाच विषयाबद्दल बोलत आहोत, तुमच्याबद्दल!

तुम्ही परदेशातल्या यंत्रणेची वाहवा करता, त्यांचे पालन करता; मात्र आपल्या देशातल्या नाही. ज्या क्षणी तुम्ही भारतीय भूमीवर उतरता, रस्त्यावर कागदाचे कपटे टाकण्यास, सिगारेटची थोटके टाकण्यास सुरवात करता….

आपण परदेशी एखाद्या व्यवस्थेचे पालन करू शकतो, त्यात समरस होऊ शकतो; त्यांचे कौतुक करू शकतो; तर भारतात का नाही?

आपण आपल्या देशात आपले लाड व्हावेत म्हणून नकारात्मक दृष्टिकोनातून बसून राहतो आणि शासनाने सर्व काही करावे, अशी अपेक्षा ठेवतो.

आपण रस्त्यावर कचरा फेकतच राहून शासनाने तो स्वच्छ करावा, अशी अपेक्षा ठेवतो.
हे सर्व जनतेला “सेवा’ प्रदान करणाऱ्या कर्मचारी वर्गालासुद्धा लागू आहे.

स्त्रिया, मुली, हुंडा, जातिव्यवस्था आणि इतर ज्वलंत सामाजिक प्रश्‍नांबाबत आपण रस्त्यावर निषेध व्यक्त करतो; आणि घरात मात्र “तेच’ करतो.

आपली सवय म्हणजे सगळी यंत्रणाच (system) बदलणे गरजेचे आहे. माझ्या एकट्याच्या बदलण्याने काय होणार, असे म्हणत आपण हुंडा मागतोच. तर आता मला सांगा- ही व्यवस्था कोण बदलणार? या व्यवस्थेचे भाग कोणकोण आहेत?

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास आपले कुटुंबीय, शेजारी, आपली खेडी, आपली शहरे, आपले सरकार आणि स्वतः आपण! व्यवस्थेला सुधारण्यासाठी आपण आपला हातभार लावण्याची ज्या वेळेस गरज असते, त्या वेळेस आपण स्वतःला स्वतःच्या कुटुंबीयांसमवेत एका कोशात बांधून दूर उभे राहतो. आणि कोणी तरी येऊन आपल्यासाठी ते करावे, ही अपेक्षा ठेवतो. आपण देशात राहतो; पण आपल्या कर्तव्यापासून दूर पळतो. भयाने पछाडलेले भ्याड लोक पळत राहतात.

आपण अमेरिकेत त्यांच्या वैभवाची, त्यांच्या मोठेपणाची ऊब घेत त्यांच्या व्यवस्थेचे कौतुक करतो; पण ज्या वेळेस न्यूयॉर्क “असुरक्षित’ वाटू लागते, आपण इंग्लंडला पळतो.

जेव्हा इंग्लंडला आपण बेरोजगारी अनुभवतो, आपण आखाती देशात पळतो. आणि जेव्हा तेथे युद्ध चालू होते; आपण आपल्या सुटकेची आणि मायदेशात शासनाने परत आणण्याची मागणी करतो!

सगळे जण देशाला, व्यवस्थेला शिव्याशाप देण्यास पुढे येतात. कोणीही व्यवस्थेला सक्षम करण्यासाठी हातभार लावत नाही, पुढाकार घेत नाही. एवढंच काय, साधा विचारही करत नाहीत.

आपली सदसद्विवेकबुद्धी व कर्तव्याची जाणीव पैशापुढे गहाण टाकली जाते.

प्रिय भारतीयांनो,
आपल्याला विचारपरिवर्तनाची व आत्मपरीक्षण करण्याची आज खरी गरज आहे.
आपल्या अमेरिकन सहकाऱ्यांना जॉन एफ. केनेडींनी भारताविषयी जे विचार सांगितले, ते मी येथे सांगू इच्छितो…
“भारतासाठी आपण काय करू शकतो ते पाहा, आणि अमेरिका व इतर युरोपीय देशांप्रमाणेच भारताला प्रगत बनवण्यासाठी जे जे आवश्‍यक आहे ते करा!’
तेव्हा, चला तर आपण “आपल्याच’ परमपवित्र मातृभूमीसाठी जे जे आवश्‍यक आहे, ज्याची आपल्या राष्ट्राला गरज आहे, ते करू यात!
आपला,
राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम


संगोपन

July 17, 2006
बालमानस समजून घेण्यासाठी…

 

वेगवेगळ्या वयामध्ये मुलांची भावनिक प्रगल्भता, भावनांचं प्रकटीकरण बदलतं. भाषिक विकास, कल्पनाशक्ती, विचारशक्ती यांमध्ये वयानुसार बदल होतात. याबाबत मानसतज्ज्ञांनी केलेल्या पाहणीतील निरीक्षणे… ……
प्रत्येक मूल वाढवताना आईवडील अनेक प्रयोग करत असतात. स्वतःच्याच मुलांमधला फरक आईवडिलांना जाणवत असतो. म्हणजेच प्रत्येक मूल हे जन्मतः स्वतंत्र बुद्धी, क्षमता, प्रज्ञा घेऊन जन्माला आलेलं असतं. त्यामुळे प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व स्वतंत्र असतं.
मूल वाढवायच्या काही पारंपरिक पद्धतींबरोबर आजकाल नवीन काही प्रयोग करून मुलांमधील क्षमता लक्षात घेऊन त्या वाढविण्याचा प्रयत्न पालक; तसेच शिक्षकही करत आहेत, ही खूप आनंदाची आणि आशादायक परिस्थिती आहे; पण मुलांच्या क्षमता कशा ओळखायच्या आणि त्या वाढवण्यासाठी काय प्रयत्न करायचे, याबाबत त्यांच्या मनात संभ्रम असतो. मुलांच्या शारीरिक वाढीकडे लक्ष देण्याबरोबरच मुलांच्या भावनिक आणि बौद्धिक विकासाचाही विचार केल्यास हा संभ्रम दूर होऊ शकतो. जशी शारीरिक वाढ टप्प्या- टप्प्याने होते, तशीच भावनिक व बौद्धिक वाढही टप्प्यानेच होते, त्यामुळे हे टप्पे विचारात घेऊन प्रयत्न केल्यास मुलांना वाढविण्याचे काम सोपे होईल.वेगवेगळ्या वयामध्ये मुलांची भावनिक प्रगल्भता, भावनांचे प्रकटीकरण बदलतं. भाषिक विकास, कल्पनाशक्ती, विचारशक्ती यांमध्ये वयानुसार बदल होतात. हे टप्पे लक्षात घेऊन मुलांशी वागण्याची पद्धत अवलंबल्यास मुलांशी सुसंवाद वाढायला मदत होते. मुलांना मिळणाऱ्या पोषक वातावरणाबरोबरच, मानसतज्ज्ञांनी ६ ते १२ वर्षांच्या मुलांबरोबर सातत्याने विविध प्रकारची माध्यमं वापरून काम केल्यास त्याचा निश्‍चितपणे सकारात्मक परिणाम दीर्घ काळापर्यंत जाणवतो.ंमुलांच्या जास्त जवळ नेऊ शकणारी माध्यमं म्हणजे खेळ, गोष्टी, गाणी शिवाय मुलांच्या क्षमता विकसनासाठी विशिष्ट उद्दिष्ट ठेवून घेतलेले बौद्धिक खेळ, प्रकल्प गटचर्चा यांचा प्रभावी उपयोग मानसतज्ज्ञ मुलांबरोबर काम करताना करतात.

पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीतील प्रज्ञामानस संशोधिकेत सुट्टीच्या काळातील शिबिरादरम्यान मानसतज्ज्ञ हेच काम करतात. अशाच स्वरूपाच्या कामाची मागणी लॉ कॉलेज रस्त्यावरील “परांजपे मराठी प्राथमिक विद्यालयांतील (महाराष्ट्र विद्या मंडळाचे) पालक- शिक्षक संघ आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुषमा शाळिग्राम यांनी ज्ञानप्रबोधिनीतील प्रज्ञा कुलकर्णी यांच्याकडे केली. यातूनच शाळेच्या नेहमीच्या तासांपेक्षा खूपच वेगळ्या स्वरूपाचे तास इयत्ता १ ली ते ४ थी या वर्गांसाठी वर्षभर घेतले गेले.

शाळेच्या पालक-शिक्षक संघातर्फे मुलांच्या नैतिक सामाजिक आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी काम करण्याचा विचार मांडला आणि हेच उद्दिष्ट समोर ठेवून प्रकल्पाची आखणी केली.

सुरवातीचा काही काळ मुलांशी सुसंवाद वाढविण्यासाठी गाणी, गोष्टी, गंमत खेळ घेतले. कृतियुक्त गाण्यांमधून, गोष्ट पूर्ण करा वगैरेमधून मुलांना मोकळे आणि बोलते करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हळूहळू बौद्धिक खेळांकडे मुलांना वळवायचे होते. त्याची तयारी म्हणून मुलांची स्थिरता, एकाग्रता, अवधानकक्षा वाढवण्यासाठी ओंकार, श्‍वसनाचे व्यायाम, प्रार्थना याचा उपयोग केला.

काही काळाने मुलांचे बौद्धिक खेळ घ्यायला सुरवात केली. ते बुद्धिमत्तेशी निगडित पैलूंवर आधारित असतात. बुद्धिमत्ता ही एकजिनसी नसते. पाठ्य पुस्तकाव्यतिरिक्त रोजच्या आयुष्यातही बुद्धिमत्तेचे वेगवेगळे पैलू वापरले जातात. गिलफोर्ड या मानसशास्त्रज्ञाने बुद्धिमत्तेचे १५० पैलू शोधून काढले आहेत. कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती, बहुदिश विचार आदी पैलू हे त्यांपैकीच आहेत. या पैलूंचा विकास करण्याच्या हेतूने बौद्धिक खेळ आखले जातात.

नैतिक विकासाचा हेतू ठेवून केलेल्या कामाबरोबरच इतरही काही गरजा जाणवल्या. त्यांपैकी एक म्हणजे स्वच्छतेचा प्रश्‍न. तो सोडविण्यासाठी वैयक्तिक स्वच्छतेचा प्रकल्प मुलांना करायला दिला. यात स्वतःचे कपडे स्वच्छ ठेवणे, वैयक्तिक स्वच्छता इ. विषय होते. यासाठी आणि वर्तन सुधारण्यासाठी “बक्षीस-शिक्षा तंत्र’ वापरले.

खेळ, गोष्टी, गाणी, बौद्धिक खेळ, प्रकल्प आदींच्या वापरातून वर्षांच्या शेवटी मुलांमध्ये जाणवण्यासारखे बदल दिसून आले. उदा. मुलांमधील मारामारी, भांडणे कमी करण्यासाठी गोष्टींमध्ये मारामारी करणारा ससा “मोनू’ कसा वाईट असतो आणि त्यामुळे त्याच्याशी कोणी कसं बोलत नाही; मग तुम्हाला कोणी “मोनू’ म्हटलं तर चालेल का? असा प्रतिप्रश्‍न करून गोष्टीद्वारे वाईट वर्तणुकीचे परिणाम त्यांच्यावर बिंबवले, आणि काही काळातच मारामारी, भांडणं कमी झाली. बौद्धिक खेळाच्या सवयीमुळे आपणहून विचार करणं सुरू झालं. प्रश्‍न विचारणं वाढलं. प्रकल्पसदृश बौद्धिक खेळातून मुलांमधील नेतृत्वगुण सहकार्यवृत्तीस कल्पनाशक्ती समस्या निवारणक्षमता आदींचे निरीक्षण करता आले.

या वार्षिक शिबिरातील अनुभवांची पालकांबरोबर देवाण-घेवाण करण्यासाठी आणि मुलांच्या विकासाकडे पालकांनी डोळसपणे बघावे, क्षमताविकासाचा प्रयत्न करावा यासाठी वर्षाच्या शेवटी सुजाण पालकत्व कार्यशाळा आयोजित केली. या कार्यशाळेला पालकांचा प्रतिसाद उत्तम होता.


लहान मुलांसाठी आज बाजारात खूप काही मिळतं. खास मुलांसाठीची दुकानं आहेत आणि शॉपिंग मॉल्सही सुरू होत आहेत. कपड्यांपासून खेळण्यांपर्यंत आणि पुस्तकांपासून विविध शैक्षणिक साधनांपर्यंत अनेक वस्तू मुलांसाठी सहजगत्या उपलब्ध आहेत. मुलांसाठीचे कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या दूरचित्रवाणी वाहिन्या आहेत. इंटरनेटवरही मुलांसाठीच्या वेबसाइट्‌स आहेत. आणि आता तर मुलांना आकर्षिक करणारे मोबाईल फोनही येत आहेत. या सर्व माध्यमांचा आणि काही खेळण्यांचा शिक्षणासाठी उपयोग होतोच; पण ते क्षणिक ठरण्याची शक्यता असु शकते.
वृत्तपत्रांमध्ये ताज्या बातम्या असतात. प्रासंगिक लेख असतात आणि लहान मुलांसाठीची सदरेही असतात. त्यामुळे मुलांना वृत्तपत्रं वाचण्याची सवय लावली पाहिजे. मूल सहा महिन्यांचे झाल्यापासून त्याला वृत्तपत्र दाखविण्यास सुरवात करावी. त्यामधील रंगीत छायाचित्रांकडे मुलं लगेचच आकर्षित होतात. मुलांना कळू लागलं, की त्यांना वृत्तपत्र द्यायला लागा. त्यातील रंजक बातम्या, लहान मुलांसाठीचा मजकूर वाचवून दाखवा. छोट्यांसाठी असलेली कोडी कशी सोडवायची हे सांगा. बहुतेक वृत्तपत्रांत चित्र रंगविण्यासाठीचे सदर असते. मुलांना चित्र रंगविण्यास सांगा. रंगवलेल्या चित्रांची चिकटवही तयार करा. मुलांसाठीच्या गोष्टींची कात्रणंही काढून ठेवा. त्यांची चिकटवही करा. ही कामं करण्यासाठी मुलांना प्रोत्साहन द्या. मुलं रमू लागतील आणि वृत्तपत्रांची आणि त्यांची गट्टी होईल. एकदा का सवय लागली, की मुलं मग वृत्तपत्राची, त्यातील बालकांसाठीच्या पुरवणीची वाट पाहू लागतील. आणि एकदा वृत्तपत्र वा पुरवणी हाती आली, की ते लगेचच चित्र रंगविण्यास किंवा कोडी सोडविण्यास सज्ज होतील.
वृत्तपत्रांतील “ऍक्‍टिव्हिटी’ करण्याबरोबरच ते वाचण्याची सवयही लावायला हवी. पालकांनी मुलांसमवेत किमान पाचेक मिनिटं तरी वृत्तपत्र वाचायला हवं. मुलांना मोठ्यानं वृत्तपत्र वाचायला सांगावं. वृत्तपत्रांत प्रसिद्ध होणाऱ्या छायाचित्रांतील व्यक्तींची ओळख करून द्या. हळूहळू मुलं स्वतःच छायाचित्रांतील व्यक्ती ओळखू लागतील. पावसाच्या बातम्या असल्या तर मग मुलांना जलचक्र समजावून द्या. वृत्तपत्र वाचून झाल्यानंतर त्यातील महत्त्वाच्या माहितीची कात्रणं काढण्यासही मुलांना प्रवृत्त करा

सुजाता होनप, तनुजा कुलकर्णी, अनया निसळ


प्रतिसाद – एक संजिवनी

July 12, 2006

प्रत्येक सभासद हा आपल्या ब्लॉग वर प्रेम करीत असतो. त्याच्या ब्लॉग

विषयीच्या भावना वेगवेग्ळया प्रकारे प्रकट होत असतील पण ऊत्कट्ता

सारखीच.शक्य होईल त्या प्रमाणे त्याला तो सजवण्याचा प्रयत्न ही

करतो. आपापाल्या कुवती प्रमाणे मनात काही आराखडे तयार करतो. येथे

कुवत म्हणजे दुसरयाने वाचुन ठरवलेली असते ती. कारण स्वताःच्या

ब्लॉगवर लीहीताना त्याच्या द्दुष्टीने कुवत नेहमी असीमच असते. त्यावर विश्वास

ठेवुन तो वाट्टेल ते वाट्टेल त्या वेळॆला लीहीत असतो.तसे व्यक्ती स्वातंत्र

आणी विचार स्वातंत्र त्याला या नेट्नेच बहाल केले.त्यामुळे बुद्धी आणी मन

यांची सांगड घालत आपल्या लाड्क्या ब्लॉगचे आयुष्य वाढ्वायच. अता मन

आणी बुद्धी हे तराजुत टाकलेल्या लोण्याच्या गोळ्या प्रमाणे असतात. कारण

मन या  विषयी कोणीही मापदंड लावु शकत नाही. एकवेळ त्या सागराची

कीती खोली? ते कळेल पण मनाची? ते शक्य न्हवे. कधी ते जगाने निषेध

केलेल्या गोष्टीची पुरर्तता करुन मागेल तर कधी जगातील अमुल्य वस्तुलाही

ठुकरावुन अगदीच साधारण गोष्टीची खातरजमा करेले याचा नेम नाही. तर या

मनाच काही संगता येत नाही. पण बुद्धीच तस नाही. तीला माप दंड आहेत.

म्हणजे तशी सर्टीफीकीटस तर जोड्ली जातात. त्याचा विचार करुन कीतपत

बुद्धी ती ठरवीता येते.अता यातही वादाचे मुद्दे असु शकतात. ज्यांच्या हाती ही

लेबल नाहीत ती ही चांगली खावुन पीवुन आहेत. मीठ्मोठी पद घेवुन कारभार

हावा तसा चालवतायतच की.(बुद्धीचा वापर वेगळ्या प्रकारे करुन, पण त्या

साठीही ती असावी लागतेच.)असो तर  तात्पर्य आसे की बहुतेकांना मन आणी

बुद्धी यांचे सम प्रमाण कींवा मी तर म्हणेन जास्त वाटा

बुद्धीचा घेवुनच लीखाण पारायण सुरु करावे लागते, काही ब्लॉग वाचले की

वाट्त काय प्रंचड बुद्धी आहे ही. पुर्ण मरठी विश्वाचच दर्शन होत.मराठी

साहित्यातले कीतीतरी पैलु त्यांनी आपल्या पुढे मांड्लेले आहेत. कीतीतरी

वेगवेळया विषयांची माहीती ते करुन देतात. त्यांचा सखोल आभ्यास … विषय

मांडण्याची हातोटी  यावरुन त्यांच्या कुशाग्र बुद्धीची चुणुक आपल्याला दिसते.

अर्थात हे त्यानीही मनापासुनच केलल असत. आशा ब्लॉगला आपण मनापासुन

दाद देतो.आशा भव्य दिव्य ब्लॉग समोर आपण म्हणजे शालु समोर

जुनाट धोतर. (ईथे चुकले आपण नाही. मी. नाही तर तुम्ही म्हणाल आमची

पैठणी नेसायची लायकी असताना हे काय धोतर वैगेरे…. )चार चैघात न

दाखवत्या येण्यारया मनाला चोर कप्यात द्ड्वत जे जे चांगले ते तुमच्या

चरणी अर्पण अस काहीस घोश वाक्य यांच असाव. कारण मनाचा तो चोर

कप्पा कप्प्यातच ठेवलेला असतो. व्ययक्तीक भावनांना सार्वजनीक ठीकाणी

कीती व कश्या प्रकारे उघड करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आता परत

हा मुद्दा की आपला ब्लॉग हे सर्वजनीक ठीकाण कस,कारण मनातल तर

उघड करायला ही खटाटॊप असते. मग वैयक्तीक झाल, पण तरीही,सार्वजनीक

वाटण्याच कारण – जरी कुणी कुणाला पाहील नाही तरी विचारांच्या माध्यमाने

प्रत्येकाने आपापल्या कुवती नुसार वाचकाच्या मनात स्वताची एक प्रतीमा

तयार केलेली असते. आणी त्याला तडा जावु नये हाच प्रत्येकाचा

प्रयत्न.  म्हणजे  स्वतःवर आपण कीती प्रेम करत असतो ते पाहा.

याच एक उदा. मी तुम्हांला देवु शकते.  

1. पाकक्रुती. 

बटाटा वडा  -  १२ प्रतीक्रीया

भजी – १० प्रतीक्रीया

रसमलाई – १९ प्रतीक्रीया

अता याला काय म्हणायच. आपला चॉईसच असा झालाय की आजु बाजुला न

पाहाता आपल्याच रिंगणात गोल गोल फीरायच. येथे ईतके सुरेख लेख मी

वाचलेत की मन थक्क झाल्या शीवाय राहात नाही.त्याची प्रगल्भता कौतुक

करण्यासारखी आहे. एकाने ‘स्त्री जिवन तुझी काहानी’हा ईतका सुंन्दर लेख

लिहीला आहे.५-६ पाने सहज असेल, कीती निरेक्षण आसेल त्यांच.कीती वेळ

घालवला असेल त्यानी त्या साठी. आधी निरीक्षण, मग विचार मंथन,आणी

मग लिखाण, पण त्या लेखाला एकही प्रतिसाद नाही. एकजण Software

Engineer. त्यानी संगीत शास्त्राची कीती छान माहिती

दिली आहे.कीती आभ्यास आहे त्यांचा त्यावर पण प्रतिसाद नाही.अशी एक

नाही १०० उदा. आहेत. कीती सुंदर कविता आहेत. प्रतिसाद एकही नाही.  तुम्ही

म्हणाल हे व्यक्ती स्वातंत्र आहे.बरोबर. पण हेच कौतुक चौकटीच्या बाहेर पडुन

जरा रुदांवुदेना. म्हणजे आप भी खुश - हम भी खुश, सभी खुश .

२.एक कविता –  स्त्री  – पुरषात एकच नात, नर मादीच.

येथे आपण २१ व्या शतकातुन एकदम आदिमानवाच्या जंगलात पोहचलो.यांनी

मात्र व्यवहाराला कमी आणी मनाला मोठे पणा देत जे वाट्ल ते खर खर

लीहील. मोठ्या मनाचे राजे.

३.यात साध्या मराठ मोवळी माणसाच्या नावापुढे ‘राव’ न लावता ‘जी’ लावुन

हिंदी भाषेच मराठी भाषेवर होणार अतिक्रमण   या वर गरमागरम चर्चा. नावा

पुढे ‘राव’ लावा नाहीतर ‘जी’ अर्थ एकच. आदराचा.मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश

येथील लोकांना ‘जी’ लावायची सवय असते त्यातुन फक्त आदर भाव

ओळखायचा, की मराठी माणसाला राव का म्हणाला नाही म्हणुन

भांडायच?तस राव ही खुप जुन झालय. अता राव म्हटलेल आवडेल कोणाला ?

४. ‘मी हे आयुष्य का जगतोय?’  हा पहिला लेख आहे ज्याने व्यवहारी बाजु

बाजुला ठेवली आणी अगदी मन मोकळ केल.हे धाड्स कोणाचाच झाल नाही.

प्रत्येकाच्या हातुन कोठेना कोठे चुक झालेली असते.(लाहान मोठी.) मन ती

कुठेतरी व्यक्त करायला  मागत असत, पण आड येते आपली अस्मिता. ती उघड

पाणॆ मांड्ली उपेन यांनी. ते त्यांच्या आयुष्यात चुक की बरोबर हे त्यांनाच

माहित. पण वाचकाने तो लेख  वाचल्यावर एवढ तर लक्षात येत की आपण

नाही या जंजाळात/ कींवा आहोत तर वेळीच सावध झाल पाहिजे. एवढ झाल

तरी त्या लेखाने खुप मीळ्वले.  प्रतिसाद एकही नाही.

मला फक्त एवढच वाटत आपण जेव्हां ब्लॉग उघडतो त्यावेळी बाकीच्य लेखांवर

नजर मारतोच.कोणी शिता वरुन भाताची परिक्षा करुन एकदोन ओळीत आपले

वाचन आटोपते घेतो तर कोणी पुर्ण लेख वाचतो. पण वाचतो आपण सगळेच.

मग वाचलेच असते तर त्यावर टिपणी द्यायला काय हारकत आहे. फार वेळ

जाणार नाही आपला,आपण जे काही लीहु ( चुक वाट्ले तर काय चुकले?

यातुन त्याच्या त्या विषयाला नविन द्रुष्टीकोन मीळ्तो. आपण आपल्या विचार

मंथनात कुठे कमी पड्लो ते कळ्त.आणी विचार आणखी प्रगल्भ

होतात.आभ्यास पकका होतो. तुम्ही म्हणाल आम्ही कोणाला शिक्षण देण्या

साठी हा  ब्लॉग सुरु केलेला नाही. बरोबर आहे ते.पण जर वाचतोच आहोत

ईतरांचे ब्लॉग तर एक – दोन ओळीचा प्रतिसाद द्यायला काय हारकत

आहे.आणी जो प्रतिसाद देवु तो मनापासुन असावा. ‘वा, खुपच छान, झकास ’

ईथ पर्यंतच मर्यादित न राहाता ‘ नाही पट्ले तुमचे विचार’, माझ्या मते

तुम्ही आमुक एक विचार परत एकदा करुन पाहा.’ असे परखड पणॆ सांगुन ते

विचार आपल्याला रुंदावता आले तर पाहावे. प्रत्येकानेच आपला ब्लॉग

मनापासुन लिहीलेला असतो.कोणीतरी वाचावा म्हणुनच. मग एखादा प्रतिसाद

देवुन आपण त्याला संजिवनी देण्यास काय हारकत आहे? या प्रतिसादानेच

प्ररीत होऊन आणखी चांगले लेख वाचकांन समोर आणतो. या

निमीत्ताने आपल्याला ही आणखी चांगले लेख वाचायला मीळ्तात. आणी

मग आपोआपच आपला ‘माराठी ब्लॉग नेट’ हा आणखी प्रगल्भ होऊन

स्वताःची उंची वाढवत जाईल.  एक मेकास साहाय्य करु अवघे धरु सुपंत. असे

मला वाटते. 


जाणिव

July 10, 2006

ह्ल्ली आपली सांकॄती खूप सुघारीत झाली आहे, असेच चित्र सगाळीकाडे दिसते.  

याला हातभार लावणारी,मागची पीढी, म्हाणजे आपले आई-वाडील. ते बारेच

शिकले.आणि आपल्या मुलानंना त्याही पेक्षा जास्त शिकवीले.आपण  एक खाड्तार

दिवस काढले, आता मुलांना मात्र सुख देउ,” हा विचार कारुन मुलांची लाग्न ठरली,

की तेव्हा पासुनच यांचे सुरु होते,”येथे जागा कामी, नाविन मुलीला अडचान नको,

तुला हावा असल्यास वेगळा फ़्ल्याट घे, आम्ही काय, आहोतच की एकमेकांना.”

माग काय,मुलीच्या भावनांचा विचार केला जातो आणी मुलगा असतो लंपट …..

जर… तर आले की मुलगा सोईने विचार कारतो ….” म्हाणजे आई-वाडिलांना नाही

सांभाळ्ले तारी चालु शकते, तसे ते काही अकदिच म्हातारे नाहित, आणी अधुन

माधुन चाक्कर टाकुन विचार पुस कारायला आहोतच  की आपण.  शिवाय आपल्या

गरजा किती? बायकोची shopping, मुलांचे शिक्षण, त्यांच्या भारमसाठ फीया, याच

खार्चाचा ताळेबंद लागता लागत नाही, त्यात आणखी कुठे, आई-वाडिलांच्या आजार

पाणाचा खार्च,शिवाय त्यानां पेंशन आहेचकी, ती मग काधी कामाला?”

आपल्या मुलांना आई – वाडिलांनीच जाणवुन दीले की,आम्हांला सांभाळ्ने हे तुझे

कार्तव्य नासुन तो तुझ्या आयुष्याचा एक भाग आहे. जासा तु जागणार आहेस मरे

पर्यांत, आणी शेवट पर्यांत साथ मागणार आहेस बायको – मुलांची, जासे ते तुझ्या

अयुष्याचा हीस्सा आहेत,तासे आंम्हीही आहोत, तुझे कुटूंब तुझ्या बायका-मुलांन

माध्ये, तसे आमचे तुझ्या माध्ये. तु जासे आयुष्यातुन त्यांना दुर कारु शाकात

नाही, तासेच तु आम्हांलाहि नाही कारु शकत.”  पण या जवाबदारीची जाणीव ही

मानापासुन झाली पाहिजे. त्याला कार्तव्याची झालर लागली की, त्यातला आपले

पणा हरवुन जातो. माला आठवत,लाहानपणी आजीला काही त्रास सुरु झाला की आई

-बाबांची कीती धावपाळ सुरु व्ह्यायची,रात्र-रात्र त्याचीं सेवा आम्हीं सागळे मिळुन

कारायचो, आजोबातर एक दीड वर्ष  बेड वर होते, आई त्यांच

कारुन थकायची,आम्हींही लाहान मोठी मादत  मनापासुन कारायचो, काहीही झाले

तारी आपले आजी – अजोबा वाचलेच पाहीजे हिच काळ्जी आसयची, आणी यात

काही वेगळे आपण करतोय आशी भावना पण नसायची,कारण  बहुतेअक घरांमध्ये

हेच चीत्र दिसायचे.

आणी आता सध्याची स्तीथी तर खुपच वाईट. कारण दहा घरांमागे आठ मुले

तरी पारदेशात आसतात ( कुटुंबासह) . N M C ’s Co. लठ्ठ पगार जो

देतात.पण यांच्या परदेशातल्या छोट्या कुटुबांत त्यांचे आई- बाबा मात्र

नसतात. या आई बाबांना मग आधार आसतो तो थोडा-फार शॆजांर्याचा.

त्यांच्या नातवंडात आपली नातवंड पाहाण्याचा, तरी त्यात शिस्त आड येते. “

जास्त कुणाची घरी जाउन बसु नये,’ पुर्वी वाडे, चाळी आस्यायच्या. तासंतास

आम्हीं एकमेकांच्या घरी बासत आसु,प्रत्येकाचा आपाप्ल्या वयाप्रमाणॆ गट

आसयचा,ती चाळ म्हणजे एक मोठ्ठ कुटूंब असायच.एकाच्या घारी साधे

पाहुणे आले तारी,ही बातमी लागेच सागळी कडॆ पासरायची,आणी मग एका

घरातल्या पाहुण्याच स्वागत सागळी मीळुन करायची.एकाच्या घरी जेवणाला

तर दुसर्याच्या घरी नाशत्याला, पाहुण्यांबारोबर बाकीच्यांची पण मजा.

उन्हाळ्याच्या सुट्टीत तर खुप मजा, रात्री १२ -१ वाजेपार्यंत आम्हीं खेळत

आसु, आणी त्याच वेळी मोठ्यांच्या आंगणात मॆऎफीली जमलेल्या आसयाच्या,

त्या वेळी काधीच कुणाच्या मनात हा प्रश्न येत नसे,”एवढा वेळ मुल भाहेर

आहेत हे बर दिसत नाहि. …..

पण आता फ्ल्याट, सोसाईटी मुळे चीत्रच बाद्ल. फ्ल्याट माध्ये एकटे

राहानारया आजी – आजोबांना विचाराव लागत, ” काय आहे.. , तु माझ्या

मुली सारखी,आमच्याहिला hart-problem आहे,तेव्हां रात्री काधी त्रास

झालाच तर तुला उठावले तर चालेल ना? म्हनजे गाडीतुन आपल्याला पाट्कन

जाता येइल.माझी गाडी आहे ग, पण रात्रीच डॊळ्यांना नीट दिसत नाही.

शेजारच्यांनी आजुन तेवढी माणुसकी जापली आहे. त्यामुळॆ त्यांच्या एकटे

पाणाची जाणीव, ठेवुन आधुन माधुन नाश्टया,  जेवण यांची देवाण घेवाण होत

आसते. आजारी  पाडलच तर विचार पुसही होते. आणी आजी – आजोबांना

दुधाची ताहान ताकावर भागवावी लागते, परदेशातल्या मुलाला याची खाबर हि

नसते.  आणी लांब राहात आसलेल्या मुलाला सांगुन काशाला त्रास

दयायचा,नाहितरी तो काय कारु शकणार आहे, आसे म्हणत दिवस धकलायचे.

आणी मुलगा….. मुलगा मात्र आपण आगदी न चुकता आई ला फोन कारुन

काशी विचार पुस कारतो, यातच धन्य मानुन घेत असतो.

तुमचं | ashwini (not verified) | ०१ जुलै २००६ - १५:५५

तुमचं निरीक्षण बरोबर आहे.
आई-वडिलांनीच सुरुवातीपासून मुलांना सैल सोडायला नको. मी नवीन पिढीचं प्रतिनिधित्व करीत असूनही मला असं वाटतं!

जबाबदारी (दुसरा दृष्टीक༯a> | saket_bagade | ०३ जुलै २००६ - १३:०९

मला या बाबतीत अजून एक बाजू मांडावीशी वाटते:

माझ्या माहितीमध्ये अशी 2 कुटुंबे आहेत की ज्यांची मुले परदेशात स्थायिक झाली आहेत. दोन्ही ठिकाणी परिस्थिती साधारण अशी आहे – आजोबा-आजी दोघेच घरी असतात. मन रमविण्यासाठी शेजारी-पाजारी जाणे, पर्यटन करणे असे चालूच असते. पण त्यांची मुलगी, जावई व नातवंडे त्यांच्याच शहरात असल्यामुळे स्वाभाविकपणे हे आजी-आजोबा आपल्या मुलीच्या संसारात ढवळाढवळ करीत असतात. मुलीचा साहजिकच आपल्या आई-वडिलांकडे ओढा असतो. आणि काहीतरी किरकोळ कारणांवरुन तिचे तिच्या सासू-सासर्‍यांशी वाद वाढत जातात. आता ह्या हसत्या-खेळत्या घरात विनाकारण कटकटी वाढतात आणि शेवटी त्या घरात सुद्धा फूट पडते. जावयाला बायको आणि आई-वडील यांच्यामध्ये बायकोची बाजू घेणे भाग पडते आणि अजून एक आजोबा-आजी आपल्याच मुलाला पारखी होतात…

अशा गोष्टींना जबाबदार कोण? परदेशात गेलेली मुले? मुलांचे सुख न मिळाल्यामुळे मुलीच्या संसारात विष कालवणारे तिचे आई-वडील? लहान मुलांकडे बघून बायकोची बाजू घेणारा नवरा? की आपल्या लहान मुलांपासून एक आजोबा-आजी हिरावून घेणारी मुलगी?

मला वाटते की प्रत्येकाने आपआपली जबाबदारी नीट पार पाडली तर कोणीच दु:खी होणार नाही…